Ex-minister sunil deshmukh alleges curroption in amravati municipal corporation : स्वच्छता कंत्राटावर प्रश्नचिन्ह; अंदाज समितीकडे तक्रारींचा पाढा, चौकशीची मागणी
Amravati अमरावती महापालिकेचा सध्याचा कारभार ‘शस्त्रक्रिया यशस्वी आणि रुग्ण दगावला’ अशा अवस्थेत असल्याची तीव्र टीका माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली. त्यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन महापालिकेतील कथित भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाजाबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
डॉ. देशमुख यांनी कोणार्क कंपनीला देण्यात आलेल्या स्वच्छतेच्या कंत्राटावर गंभीर आक्षेप नोंदवले. निविदेतील अटी व प्रत्यक्ष करारनाम्यात मोठी तफावत असून, आवश्यक क्षमता नसलेल्या एजन्सीला मर्जीने कंत्राट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. २०२५ नोंदणीची वाहने अपेक्षित असताना २०२३ मधील वाहने वापरली जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
Ncp leadership conflict : प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार शीतयुद्ध उघड !
शहरातील अनेक व्यापार संकुलांची लीज संपूनही महापालिका निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्याने निविदा काढण्याचे निर्देश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
अंदाज समितीकडे सादर केलेल्या निवेदनात स्वच्छता कंत्राटातील अपारदर्शकता, घनकचरा व्यवस्थापनातील अनियमितता, तसेच परजिल्ह्यातील ५३ शिक्षकांच्या समायोजनात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. आमसभेत चर्चा होऊनही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Tcs crime news : पेयातून गुंगीचं औषध देत महिलांचं शोषण धर्मांतर रॅकेटच्या संशयाने खळबळ
शहराच्या हिताऐवजी वैयक्तिक स्वार्थ जपल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत, या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी केली. आता या तक्रारींवर अंदाज समिती को








