व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Dilip Sananda : सानंदा पुन्हा कसोटीवर; अपेक्षित संधी हुकल्याने राजकीय गणिते बिघडली

Dilip Sananda : सानंदा पुन्हा कसोटीवर; अपेक्षित संधी हुकल्याने राजकीय गणिते बिघडली

After missing out on an opportunity, focus now shifts to the next move of Dilip Sananda : सत्तेत असूनही संघर्ष कायम; सानंदा यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष

Buldhana जिल्ह्यातील राजकारणात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या अलीकडील हालचालींनी नव्याने चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसची साथ सोडत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला असला, तरी सत्ताधारी गटात सहभागी झाल्यानंतरही त्यांच्या राजकीय अडचणी पूर्णपणे दूर झालेल्या दिसत नाहीत.
राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, विधानपरिषदेत संधी मिळावी यासाठी सानंदा समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात ‘लॉबिंग’ करण्यात आले होते. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या गोटात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या घडामोडींमुळे सानंदा यांच्या नव्या राजकीय समीकरणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, त्यांचा पारंपरिक राजकीय विरोधक आकाश फुंडकर यांच्यासोबतचा संघर्ष अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. सत्ताधारी गटात असूनही स्थानिक पातळीवरील हे राजकीय द्वंद्व कमी झालेले नाही. त्यामुळे सानंदा यांना एकाच वेळी सत्तेतील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील विरोधकांचा सामना करावा लागत आहे.

Rajasingh Thakur : अकबराच्या समाधीवरून वादग्रस्त मागणी; हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदूंवर अन्याय

या पार्श्वभूमीवर सानंदा यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी संघटनात्मक बळकटी देणे ही मोठी गरज ठरणार आहे. सध्या सिंदखेड राजा मतदारसंघापुरती मर्यादित असलेली राष्ट्रवादीची ताकद घाटाखालील भागात विस्तारण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. पक्ष विस्तारासोबतच स्थानिक नेतृत्व मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे आणि विरोधकांच्या प्रभावाला प्रत्युत्तर देणे, या सर्व बाबी त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असणार आहेत.

Dr. Sunil Deshmukh : मनपाचा कारभार म्हणजे, ‘शस्त्रक्रिया यशस्वी, रुग्ण दगावला’; माजी मंत्र्यांचा भ्रष्टाचारावर घणाघात

सत्ताधारी गटात प्रवेश केल्यानंतरही सानंदा यांच्यासमोरची आव्हाने कमी झालेली नसून ती अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. आगामी काळात त्यांची राजकीय वाटचाल केवळ पदप्राप्तीवर अवलंबून न राहता, संघर्ष आणि संघटन विस्ताराच्या क्षमतेवर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे

error: Content is protected !!