व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Assembly election results : “पाच राज्यांच्या निकालात भाजपचा राष्ट्रव्यापी दबदबा!

Assembly election results : “पाच राज्यांच्या निकालात भाजपचा राष्ट्रव्यापी दबदबा!

assembly-election-results-2026-bjp-dominance-west-bengal-tamilnadu-kerala-assam-puducherry : आसाम, पुद्दुचेरी, बंगालमध्ये कमळ फुलले, केरळ मध्ये काँग्रेस, दक्षिणेत नवे राजकीय समीकरण

New Delhi : देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राष्ट्रीय राजकारणात मोठे बदल दिसून आले आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करत आपला राजकीय विस्तार अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजपने दीर्घकाळ टिकून असलेला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये २९३ जागांपैकी भाजपने तब्बल १९५ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तृणमूल काँग्रेस ९२ जागांवरच मर्यादित राहिली असून काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. डाव्या पक्षांना केवळ २ जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे बंगालमध्ये प्रथमच भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला मोठा धक्का बसला आहे.

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांचा देशातील सर्वात मोठा मताधिक्याचा विक्रम !

तामिळनाडूमध्येही पारंपरिक द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख पक्षांना मागे टाकत विजय थलपति यांच्या टीव्हीके पक्षाने १०६ जागांसह सर्वाधिक कामगिरी केली आहे. द्रमुकला ६८ आणि अण्णाद्रमुकला ५८ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे तामिळनाडूच्या राजकारणात तिसऱ्या पर्यायाची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे.

केरळमध्ये दीर्घकाळ डाव्या आघाडीचा प्रभाव असलेल्या राजकारणात मोठा बदल घडत काँग्रेसने १०४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. डावी आघाडी केवळ ३४ जागांवर आघाडीवर राहिली असून राज्यातील पारंपरिक समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.

West Bengal Election results : “पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक उदय; ‘शाह’ यांची भविष्यवाणी ठरली अचूक

आसाममध्ये भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता टिकवून ठेवत १०० जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला २० जागांवर समाधान मानावे लागले असून इतरांना ६ जागा मिळाल्या आहेत. पुद्दुचेरीमध्येही भाजपने २२ जागांसह आघाडी घेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

या निवडणूक निकालांमुळे भाजपची देशभरातील पकड आणखी मजबूत झाली असून आगामी काळात पक्ष अधिक आक्रमक राजकीय रणनीती अवलंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, या निकालातून विरोधी पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

Dr. Pankaj Bhoyar on Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार हे राज्याला लाभलेले अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केला गौरव

दरम्यान, महाराष्ट्रातही पोटनिवडणुकांचे निकाल चर्चेत राहिले. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी तब्बल १ लाख १२ हजार ५८७ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना ५ हजार ६९० मते मिळाली.

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित करत २ लाख १८ हजार ९३० मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. या निकालामुळे पवार कुटुंबाचा प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला असून राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

एकूणच, पाच राज्यांच्या निकालांनी देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे स्पष्ट केली असून भाजपचा वाढता प्रभाव आणि विरोधकांची घटती ताकद हे या निवडणुकांचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.

___

error: Content is protected !!