Pankaj Bhoyar praises Sudhir Mungantiwar as a knowledgeable and bold leader for the state : मुनगंटीवारांचे योगदान राजकारण व समाजकारणात दीपस्तंभासारखे असल्याची भावना
Wardha महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सुधीर मुनगंटीवार यांचे योगदान हे दीपस्तंभासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने जपण्याचे आणि तो कृतीत उतरवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या रुपाने राज्याला एक अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व लाभले आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचा गौरव केला. वर्धा येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार मुनगंटीवार, माजी खासदार रामदास तडस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. आमदार मुनगंटीवार यांनी शिवचरित्रातील ज्वलंत इतिहासाला उजाळा दिला. अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविण्यापासून ते लंडनमधून वाघनखं भारतात आणण्यापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास हा शिवचरित्रावरील अढळ श्रद्धेचाच भाग आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.
Rahuri by election : “राहुरीत कमळाची आघाडी भक्कम; विरोधक मोठ्या पिछाडीवर
वर्धा येथे अनावरण करण्यात आलेले राजदरबाराचे भव्य भित्तीशिल्प युवा पिढीला स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच श्रीशैलम येथे ध्यानमंदिर आणि कुपवाडा येथे शिवरायांचा पुतळा उभारण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
रामदास तडस यांनी आपल्या कार्यकाळात जनसामान्यांचे प्रश्न ज्या हिमतीने मांडले आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जो सातत्यपूर्ण पाठपुरावा केला, तो अत्यंत कौतुकास्पद असून त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या राजकीय जडणघडणीत सदैव होत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
Baramati by election : “बारामती पोटनिवडणुकीत पवार घराण्याचा एकहाती दबदबा
या राजकीय व सामाजिक सोहळ्याला नगराध्यक्ष सुधीरभाऊ पांगुळ, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाथे, नगरसेविका राखी पांडे, जयश्री आगरकर, प्रियंका खंगार, स्नेहा आखरे, विधानसभा महिला मोर्चा प्रमुख चित्राताई ठाकूर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभय नगरे, दुर्गेश पांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.








