व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Nasrapur crime : “फाशीही कमीच, जिवंत जाळा त्या नराधमाला”

Nasrapur crime : “फाशीही कमीच, जिवंत जाळा त्या नराधमाला”

pune-nasrapur-bhor-crime-brutal-murder-outrage-family-demands-strict-punishment : नसरापूर प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांचाही संताप अनावर

Pune: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या अमानुष कृत्यामुळे सर्व स्तरातून कठोर शिक्षेची मागणी होत असतानाच, आरोपीच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीही माध्यमांसमोर येत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असली तरी जनतेचा आक्रोश थांबण्याचे नाव घेत नाही.

या प्रकरणातील आरोपीने केलेले हे पहिले कृत्य नसल्याचे समोर आले असून याआधीही दोन वेळा तो सुटल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावेळी तरी त्याला कोणतीही सवलत न देता कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेला संताप अधिकच तीव्र ठरत आहे.

आरोपीच्या मुलाने आपल्या वडिलांविषयी तीव्र संताप व्यक्त करत, “मला त्याला बाप म्हणून स्वीकारायलाही लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो. सरकारने त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळालाच पाहिजे,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्याने पीडित मुलगी आपल्यासाठी भाचीसारखी असल्याचेही नमूद करत भावनिक प्रतिक्रिया दिली.

Women commission : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएसची एन्ट्री?

आरोपीच्या पत्नीनेही अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. “त्याला जिवंत जाळा, उभं जाळा. मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला सांगायला कोणी येऊ नये. फाशीची शिक्षा त्याच्यासाठी खूपच कमी आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पुढे सांगितले की, “मी सुद्धा आई आहे. त्या निष्पाप बाळाच्या आईवर काय बीतत असेल याची मला पूर्ण जाणीव आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही.”

आरोपीसोबत गेल्या दहा वर्षांपासून कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी आणि माझा मुलगा वेगळे राहतो. अनेकदा त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तो नेहमी आम्हाला झिडकारायचा,” अशी माहिती त्यांनी दिली. या विधानांमुळे आरोपीच्या कुटुंबीयांनाही त्याच्या कृत्याचा तिटकारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीसाठी आजीकडे आलेली चार वर्षांची चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून निर्दयपणे दगडाने ठेचून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून फरार झाला. या भीषण घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Bjp big win : पाच राज्यांच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट, पहा ए टू झेड आकडेवारी !

या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त होत असून आरोपीला तत्काळ आणि कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. निष्पाप चिमुरडीवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यावेळी कोणतीही चूक होऊ नये, अशी ठाम भूमिका समाजातून मांडली जात आहे.

error: Content is protected !!