व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule : बंगालमध्ये दडपशाहीचा अंत आणि विकासाचा झंझावात; विरोधकांनी आता तरी...

Chandrashekhar bawankule : बंगालमध्ये दडपशाहीचा अंत आणि विकासाचा झंझावात; विरोधकांनी आता तरी आत्मपरीक्षण करावे

Chandrashekhar bawankule targets opponent after bengal results : चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना सल्ला, मोदी-शाह यांना दिले श्रेय

Nagpur पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने ममता बॅनर्जी यांच्या कथित दडपशाहीच्या राजकारणाला पूर्णपणे नाकारून विकासाच्या बाजूने ऐतिहासिक कौल दिला आहे. हा विजय म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा आणि सुशासनाचा विजय आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मंगळवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बंगालमधील निकालांवरून काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

बावनकुळे पुढे म्हणाले की, देशातील मतदार आता केवळ विकासाच्या राजकारणाभोवती एकवटत आहे. बंगालच्या जनतेने एका विकसित राज्यासाठी मतदान केले असून, विरोधक मात्र अजूनही जुन्या आणि नकारात्मक राजकारणात अडकलेले आहेत. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आता तरी यातून धडा घ्यावा आणि आपली कार्यपद्धती बदलावी. महाराष्ट्रातही जनता विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभी असून, आगामी काळात विरोधकांना जनतेचा कोणताही पाठिंबा मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Hindi exam stay : हिंदी भाषा परीक्षेला अखेर स्थगिती, मंत्री उदय सामंत यांची घोषणा !

यावेळी नरसापूर येथील धक्कादायक घटनेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी सरकारचा आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. “संपूर्ण महाराष्ट्र पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, या प्रकरणातील आरोपींवर कठोरतम कारवाई केली जाईल. पोलिसांकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.

Akola crime : पुण्यानंतर अकोल्यातही… 60 वर्षीय वृद्धाकडून 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

बंगालमधील संघटनात्मक यशाबद्दल बोलताना बावनकुळे यांनी संघ परिवाराच्या आणि भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, हा विजय मिळवण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कणखर नेतृत्व, गृहमंत्री अमित शाह यांचे सूक्ष्म नियोजन आणि बूथ स्तरावरील मजबूत व्यवस्थापनामुळेच बंगालमध्ये सुशासनाचे स्वप्न साकार झाले आहे. कार्यकर्त्यांच्या रक्ताचे आणि घामाचे चीज आज झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!