General elections announced for the post of Municipal Council President and 20 corporator seats : पातूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर; अकोटमध्ये पोटनिवडणूक
Akola राज्य निवडणूक आयोगाने अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अकोट नगर परिषदेतील रिक्त पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
पातूर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार असून, अकोट नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक ४ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अधीन राहून पार पडणार आहे. पातूर नगर परिषदेची प्रभागरचना निर्धारित कालावधीत पूर्ण झाल्याने येथे नव्याने सार्वत्रिक निवडणूक घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Bacchu kadu : मला बदनाम करण्यासाठी ‘वॉर रूम’, बच्चू कडूंचा आरोप
निवडणूक कार्यक्रमानुसार १२ मे रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १८ ते २५ मे दरम्यान राहणार आहे. २६ मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ मे ते २ जूनदरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत.
Mahayuti plan : विरोधकांची झोप उडवणारा महायुतीचा नवा ‘पॉवर प्लॅन’
२ जून रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान २० जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, २१ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान, नामनिर्देशनपत्रांची स्वीकृती पारंपरिक पद्धतीनेच करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.








