devendra-fadnavis-supports-pm-modi-appeal-petrol-diesel-work-from-home : मोदींच्या ‘ऊर्जा बचत मंत्रा’चे सर्वांनी पालन करण्याचा सल्ला
Mumbai: “वेळ ओळखा, इंधन जपून वापरा”, जनतेला मुख्यमंत्र्यांचे आवाहनमध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, वाढती जागतिक महागाई आणि इंधन टंचाईच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस आणि इतर संसाधनांचा वापर अत्यंत गरजेपुरताच करावा, असे सांगत फडणवीस यांनी नागरिकांनी पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देशवासीयांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताच्या दृष्टीने जे सांगितले आहे, ते अत्यंत योग्य आहे. तेल आणि गॅसचा वापर गरजेप्रमाणेच करायला हवा. जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये तर पेट्रोलचे दर साडेचारशे रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, भारतात पंतप्रधान मोदींनी कुठल्याही परिस्थितीत पुरवठा खंडित होऊ दिलेला नाही.”
Rahul gandhi : मोदींच्या ‘त्याग मंत्रा’वर राहुल गांधींचा पलटवार
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, जर नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले नाही आणि इंधनाचा वापर नियंत्रित केला नाही, तर भविष्यात भारतालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील जनसभेत देशवासियांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. मध्यपूर्वेतील युद्ध, इराण-अमेरिका तणाव आणि जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे भारतावरही आर्थिक दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताकडे मोठ्या प्रमाणावर तेलसाठे नसल्यामुळे जागतिक संकटाचा थेट परिणाम देशावर होतो, असेही त्यांनी नमूद केले.
PM Modi : ‘हायब्रिड वर्क मॉडेल’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा मोदी मंत्र !
पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यावर भर दिला. ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचेही त्यांनी सुचवले. कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या पद्धती पुन्हा स्वीकारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी देशवासियांना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचा सल्लाही दिला. परकीय चलनाचा साठा मजबूत ठेवण्यासाठी अनावश्यक आयात कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवणे, परदेशी प्रवास टाळणे आणि परकीय उत्पादनांची खरेदी कमी करणे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
Sudhir Mungatiwar : राजकारणापलीकडचं नेतृत्व : प्रश्न जनतेचे, लढा मुनगंटीवारांचा
युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असताना भारताने संयम आणि शिस्त राखणे गरजेचे असल्याचे मत राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांनंतर आता केंद्र आणि राज्य सरकार ऊर्जा बचत, इंधन वापर नियंत्रण आणि ‘ग्रीन वर्क मॉडेल’संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
___








