व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : राजकारणापलीकडचं नेतृत्व : प्रश्न जनतेचे, लढा मुनगंटीवारांचा

Sudhir Mungatiwar : राजकारणापलीकडचं नेतृत्व : प्रश्न जनतेचे, लढा मुनगंटीवारांचा

Leadership that consistently fights in the Legislative Assembly for the issues of the people Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार म्हणजे अभ्यास, आकडेवारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी बुलंद आवाज

Nagpur – राजकारणात भाषणांची आणि घोषणांची कमतरता नसते, मात्र अभ्यासाच्या जोरावर प्रशासनाला धडकी भरवणारे नेतृत्व दुर्मिळ असते. अशाच मोजक्या नेतृत्वांपैकी एक नाव म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार. केवळ पक्षीय राजकारण न करता, सामान्य माणसाच्या वेदनांना सभागृहात शब्द देणारा अभ्यासू चेहरा’ म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आजच्या काळात विरोधाची धार अनेकदा केवळ गोंधळ आणि सोशल मीडियापुरती मर्यादित दिसते. मात्र, मुनगंटीवार यांची शैली वेगळी आहे. ते जेव्हा एखादा मुद्दा मांडतात, तेव्हा त्यामागे सखोल अभ्यास आणि अचूक आकडेवारी असते. यामुळेच त्यांच्या प्रत्येक भूमिकेला राजकीय दिखाव्यापेक्षा जनतेच्या तळमळीचा आधार अधिक असतो.शेतकऱ्यांच्या धानाचा भाव असो, विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती असो किंवा रखडलेले विकास प्रकल्प; मुनगंटीवार यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांची ही आक्रमकता व्यक्तीविरोधी नसून ती व्यवस्थेला जागं करण्यासाठी असते. अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून मिळालेला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने, प्रशासकीय गुंतागुंत सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Dr. Pankaj Bhoyar on Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार हे राज्याला लाभलेले अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केला गौरव

लोकप्रियतेचा विचार न करता थेट भूमिका घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य. एखाद्या विषयावर बोलताना ते कोणत्याही दबावाखाली न येता सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच जेव्हा ते बोलतात, तेव्हा सर्वसामान्य माणसाला आपला प्रश्न ताकदीने मांडला जात असल्याची खात्री पटते.

लोकशाहीत आमदाराला मिळालेले अधिकार हे केवळ प्रतिष्ठेसाठी नसून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहेत, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या संघर्षात सूड नाही आणि टीकेत केवळ राजकारण नाही, तर त्यात उपाय सुचवण्याची दृष्टी असते.

https://sattavedh.com/sudhir-mungatiwar-mul-railway-goods-shed-project-finally-halted-powerful-follow-up-by-mla-sudhir-mungantiwar-achieves-major-succes

महाराष्ट्राच्या राजकारणाला आज अशाच संवेदनशील आणि प्रशासनाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाची गरज सदैव आहे. ती कायम लोकशाहीचे खरे सैनिक म्हणून पूर्ण करतांना मुनगंटीवार पुढे आहे.विधानसभेत जेव्हा सुधीर मुनगंटीवार उभे राहतात, तेव्हा तो आवाज केवळ एका आमदाराचा नसून तो सामान्य माणसाच्या अपेक्षांचा आणि न्यायाच्या मागणीचा असतो, हे त्यांचे विशेष आहे.

error: Content is protected !!