व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nana patole : पंतप्रधानजी, काटकसरीचे डोस पाजण्यापूर्वी स्वतःपासून सुरुवात करा

Nana patole : पंतप्रधानजी, काटकसरीचे डोस पाजण्यापूर्वी स्वतःपासून सुरुवात करा

Congress mla Nana patole attacks PM Narendra Modi on latest statement : चार्टर्ड विमाने आणि रॅलींच्या लवाजम्यावरून नाना पटोलेंचा थेट प्रहार

Nagpur सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकलून काटकसरीचा सल्ला देण्यापेक्षा, सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या चैनीला लगाम घालून आदर्श निर्माण करावा,अशा कडक शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांच्या आगामी परदेश दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या चार्टर्ड विमानांचा वापर आणि रॅलींमधील अवाढव्य खर्चावरून पटोले यांनी जोरदार राजकीय टीकास्त्र सोडले असून, काटकसरीची सुरुवात तुमच्यापासून करा, असा खरमरीत सल्ला दिला आहे.

पंतप्रधान मोदी लवकरच नॉर्वे, स्वीडन, यूएई आणि इटली या देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी त्यांच्या मागील दौऱ्यांचा पाढाच वाचला आहे. त्यांनी पत्रात नमूद केले की, नुकतेच तेलंगणा, बेंगळुरू आणि जामनगर येथे झालेले दौरे चार्टर्ड विमानाने पार पडले आणि यावेळी स्वागतासाठी मोठमोठ्या रॅली काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये हजारो कार्यकर्ते आपापल्या वाहनांसह सहभागी झाले होते, ज्यामुळे इंधनाची मोठी उधळपट्टी झाली. “आजच्या परिस्थितीत इंधनाची काटकसर करणे गरजेचे असताना, चार्टर्ड विमानांचा आणि अवाढव्य वाहन ताफ्याचा वापर करणे हे सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,असेही पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
मोदी यांनी देशाला उद्देशून पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करून एक प्रकारे देशावर ओढावलेल्या संकटाची चाहूल दिली असल्याचे बोलले जात आहे. करोनाकळाचा उल्लेख करताना त्यांनी वर्क फॉर्म करण्याचा सल्लाही दिला आहे. पंतप्रधान यांचा हा सल्ला धोक्याचा इशारा मानला जातो.

Big decisions : मोदींच्या आवाहनानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

नाना पटोले यांनी आपल्या पत्रातून सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे. सामान्य नागरिकांना महागाईशी दोन हात करताना काटकसरीचे सल्ले दिले जातात, मात्र लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी स्वतः मात्र सरकारी खर्चाने लवाजमे मिरवतात, ही विसंगती त्यांनी अधोरेखित केली. योग्य संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर चार्टर्ड विमानांचा वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंधन दरवाढीने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी रॅली आणि इव्हेंटवर होणारा खर्च थांबवून पंतप्रधानांनी स्वतःपासून बदलाला सुरुवात करावी, या पटोलेंच्या आक्रमक मागणीमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!