व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur university : कुलगुरू बदलले तरी नागपूर विद्यापीठाचा कारभार ‘जैसे थे’

Nagpur university : कुलगुरू बदलले तरी नागपूर विद्यापीठाचा कारभार ‘जैसे थे’

nagpur-university-student-issues-bjym-protest-discussion-session : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाजयुमो आक्रमक, १८ मे रोजी विशेष चर्चासत्र

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रशासकीय अनास्था आणि सतत समोर येणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू बदलले असले तरी कारभारात कोणताही सुधारणा झाल्याचे दिसत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. निकालांमधील गोंधळ, रखडलेल्या पदव्या, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत होणारा विलंब आणि प्रशासनाच्या कथित मनमानीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या वाढत्या अडचणी आणि विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेविरोधात आता भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजयुमोतर्फे सोमवार, १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष ‘विद्यापीठ विद्यार्थी समस्या चर्चा’ सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांतून सातत्याने समोर येणाऱ्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींची दखल घेत भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या सूचनेनुसार हा पुढाकार घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Ashok kharat :17 गुन्हे, 105 साक्षीदार, ईडीचा तपास अन् राजकीय कनेक्शनमुळे प्रकरण अधिक गंभीर!

या चर्चासत्रात नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य विष्णू चांगदे, भाजयुमो नागपूर शहराध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, ऋषभ अरखेल, कुलदीप माटे, अथर्व त्रिवेदी, युवती प्रमुख प्रशंसा भोयर आणि विद्यार्थी आघाडी प्रमुख शंतनू झाडे हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाशी संबंधित विविध समस्या, शैक्षणिक अडचणी आणि प्रशासनाविषयीच्या तक्रारी विद्यार्थ्यांना थेट मांडण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत भाजयुमो विद्यापीठ प्रशासनाशी थेट चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होत असलेली कथित अडवणूक, कागदपत्रांसाठी होणारा विलंब आणि विविध प्रशासकीय अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचा दावा भाजयुमोकडून करण्यात आला आहे.

Epfo pension : ईपीएफओचा मोठा प्लॅन; किमान पेन्शन तिप्पट होण्याची शक्यता

दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि संबंधित आवश्यक कागदपत्रांसह या चर्चासत्राला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजयुमो शहराध्यक्ष सचिन करारे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाजयुमोने थेट विद्यापीठ प्रशासनाविरोधात भूमिका घेतल्यामुळे आता विद्यापीठ प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!