व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Ashok kharat :17 गुन्हे, 105 साक्षीदार, ईडीचा तपास अन् राजकीय कनेक्शनमुळे प्रकरण...

Ashok kharat :17 गुन्हे, 105 साक्षीदार, ईडीचा तपास अन् राजकीय कनेक्शनमुळे प्रकरण अधिक गंभीर!

ashok-kharat-crime-case-17-cases-105-witnesses-ed-investigation-nashik : भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी वाढल्या;

Nashik : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले असून तपासाचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. “चोर आले, चोर आले…” असा बनाव रचत गुंडविरोधी पथकाने अशोक खरातला त्याच्या घरातून अटक केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात अंधश्रद्धा, महिलांवरील लैंगिक अत्याचार, कोट्यवधींची आर्थिक फसवणूक, बोगस आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांचे अनेक धक्कादायक धागेदोरे समोर आले आहेत.

सध्या अशोक खरात हा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात असून विशेष तपास पथक आणि अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर पुरावे गोळा केले असून तपास निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

Ncp political crisis : पार्थ पवारांची मुख्यमंत्र्यांशी गुप्त भेट, आनंद परांजपे थेट सिल्व्हर ओकवर

अशोक खरातविरोधात नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि इतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांवर अत्याचार करणे, लोकांना मानसिक दबावाखाली ठेवून आर्थिक फसवणूक करणे, जमीन व्यवहारांमध्ये फसवेगिरी करणे आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास विशेष तपास पथाकडे वर्ग करण्यात आला आहे.

तपास यंत्रणांनी पहिल्या दोन महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपास अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांनी पीडित महिला, आर्थिक फसवणुकीतील फिर्यादी, तसेच अशोक खरातच्या संपर्कातील व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. आतापर्यंत तब्बल 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून या माध्यमातून गुन्ह्यांची संपूर्ण साखळी उलगडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे समोर आले आहे.

Pm Narendra Modi : ऊर्जा संकट आणि जागतिक युद्धांच्या सावटामुळे विकास धोक्यात

या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचे धागेदोरे समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानेही तपासाची सूत्रे हलवली आहेत. विविध पतसंस्थांमधील संशयास्पद व्यवहार, बोगस खाती आणि पैशांच्या गैरव्यवहारांचा तपास सुरू असून काही राजकीय संबंधांचाही तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ अंधश्रद्धेपुरते मर्यादित न राहता आर्थिक गुन्हे आणि प्रभावशाली व्यक्तींशी असलेल्या संबंधांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्ती आणि चाकणकर भगिनींचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा विविध आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rashtrawadi Congress : इंधन बचतीसाठी सुटीच्या दिवशी शासकीय गाड्यांचा कौटुंबिक वापर रोखणार; राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट प्रशासनाला इशारा

राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेल्या या प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अशोक खरातच्या कथित साम्राज्याचे नवे पैलू उघड होत असून येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

_

error: Content is protected !!