Sudhir Mungantiwar Moved by the Warm Welcome Extended by 85-Year-Old Sumanbai Arde : ८५ वर्षीय सुमनबाई आरडे यांनी आनंदाने केलेल्या स्वागताने डोळ्यांत दाटल्या भावना
Chandrapur काही क्षण हे केवळ घटना नसतात, तर भावनेच्या रुपात मनात घर करतात. चंद्रपूरच्या उज्ज्वला महादेव सोयाम यांना ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मात्र, या भेटीदरम्यान घडलेला एक भावनिक प्रसंग सध्या चंद्रपुरात चर्चेचा विषय ठरत आहे.
भेटीदरम्यान ८५ वर्षीय सुमनबाई आरडे यांनी आनंदाने नृत्य करत मुनगंटीवार यांचे स्वागत केले. वयाच्या या टप्प्यावरही त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, डोळ्यांतील माया आणि मनातील आत्मीयता पाहून उपस्थितही भारावून गेले. एका जननेत्याप्रती सामान्य नागरिकांच्या मनात असलेला जिव्हाळा आणि आपुलकी या प्रसंगातून प्रकर्षाने समोर आली.
Cockroach janta party : सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धडाका
विशेष म्हणजे पुरस्काराचा आनंद असतानाही उपस्थितांच्या मनाला अधिक स्पर्शून गेला तो सुमनबाईंच्या निखळ प्रेमाचा क्षण. त्यांच्या स्वागतामागे कोणताही औपचारिकपणा नव्हता. त्यामुळे हा प्रसंग केवळ स्वागतापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो मायेचा आणि आत्मीयतेचा अनोखा आविष्कार ठरला.
या प्रसंगानंतर मुनगंटीवारही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. लोकांकडून मिळणारे प्रेम, जिव्हाळा आणि आशीर्वाद हीच खरी कमाई असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पद, प्रतिष्ठा आणि सन्मान यांच्याही पलीकडे जाऊन माणूस जर काही कमावत असेल, तर ती अशी माणसं आणि त्यांचं निस्सीम प्रेमच असतं, असे सांगत त्यांनी सुमनबाई आरडे यांचे आभार मानले.
Ips transfer : महाराष्ट्र पोलीस दलात सत्ताकेंद्रित मोठा फेरबदल
अशा आत्मीयतेच्या स्पर्शातून समाजासाठी अधिक काही करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. सुमनबाईंच्या प्रेमळ स्वागताने आणि आशीर्वादाने हा क्षण उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेला.








