Chandrashekhar Bawankule confident about winning all legislative seats : सर्व जागांवर महायुतीचाच विजय होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा
Nagpur राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आज दिली.
महायुतीचे जागावाटप ९९ टक्के निश्चित झाले असून, भाजप आपले उमेदवार ठरवून मित्रपक्षांसह पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे.या वेळी त्यांनी भाजपचे उमेदवारसुद्धा ठरले असल्याचे सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून आम्ही एकत्रितपणे महायुती म्हणूनच ही निवडणूक लढणार आहोत आणि सर्वच्या सर्व १७ जागांवर महायुतीच विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Diesel crisis : मुख्यमंत्र्यांचे दावे खोटे, शेतकरी डिझेलसाठी रात्रंदिवस रांगेत
जागावाटपाच्या सूत्राबाबत अधिक माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, या निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे. ‘सिटींग जागा’ म्हणजेच सध्या ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा आणि कोणाचे संख्याबळ किंवा जागा जास्त आहेत, त्यानुसारच हे वाटप केले जाईल. हाच फॉर्म्युला आम्ही यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही यशस्वीपणे वापरला असून केंद्र व राज्य पातळीवर याचे नियोजन आधीच ठरवले गेले आहे.
Petrol diesel price : इंधन दरवाढीचा झटका! सरकारच्या निर्णयाने पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग
या जागावाटपावर आता केवळ अंतिम औपचारिकता बाकी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावर अंतिम शिक्कामोर्तब करतील, अशी माहिती त्यांनी दिली. रखडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जागावाटप उरकून विरोधकांवर राजकीय आघाडी घेतली असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. सर्वाधिक उत्सुकता नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थानमधून भाजप कोणाला उमेदवारी देते याची लागली आहे.
या मतदारसंघातून यापूर्वी स्वतः बावनकुळे निवडून आले होते. ही जागा नागपूर ग्रामीणला देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. राजीव पोतदार आणि किशोर रेवतकर यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.वर्धा मतदारसंघातून अरुण लाखानी आणि भंडारा – गोंदिया मतदार संघातून वीरेंद्र कुकरेजा यांचे तिकीट पक्के मानले जात आहे.








