व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Diesel shortage : डिझेल टंचाईविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मेरा चौकीवर दोन तास रास्तारोको,...

Diesel shortage : डिझेल टंचाईविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मेरा चौकीवर दोन तास रास्तारोको, महामार्ग ठप्प

Farmers protest diesel shortage; two-hour road blockade brings highway traffic to a standstill : कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Chikhli गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर मेरा चौकी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ रास्तारोको आंदोलन छेडले. दुपारी १२ ते २ या वेळेत तब्बल दोन तास पुणे–नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कॅनमध्ये डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ऐन शेती हंगामाच्या तोंडावर ट्रॅक्टर व कृषी अवजारांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज असताना चिखली परिसरात इंधन टंचाई निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अनेक शेतकरी दिवसरात्र पेट्रोल पंपांवर रांगा लावत असतानाही डिझेल उपलब्ध होत नसल्याने नाराजी वाढली होती. विशेषतः कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

Irregularities in grampanchayat : दहीहंडा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार, उच्चस्तरीय चौकशी करा

रास्तारोकोमुळे पुणे–नागपूर महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी व वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. कामाच्या वेळेत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.

आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड आणि ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. डिझेल पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

error: Content is protected !!