Chandrashekhar bawankule attacks Rahul Gandhi and Rohit pawar : रोहित पवारांच्या राजकारणावरही प्रहार, ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’साठी मैदानात
Nagpur राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’च्या निमित्ताने मैदानात उतरलेल्या बावनकुळे यांनी केवळ प्रशासकीय इशाराच दिला नाही, तर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर थेट राजकीय हल्ला चढवून आगामी निवडणुकीचे वातावरण तापवले आहे. देवस्थान कायद्यावरून होणाऱ्या राजकारणाला चोख उत्तर देत त्यांनी विरोधकांच्या अफवांचा फुगा हवेतच फोडला.
राष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ घेत बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. राहुल गांधी यांच्या अलीकडील वक्तव्यांचा समाचार घेताना ते म्हणाले, देशातील जनतेने विकसित भारताच्या संकल्पासाठी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी आता थेट २०४७ पर्यंत सत्तेची वाट पाहावी. तोपर्यंत त्यांनी आपले विदेश दौरे सुरू ठेवावे आणि स्वतःला राजकीयदृष्ट्या अधिक सक्षम करावे; तूर्तास त्यांनी सत्तेचा विचार मनातही आणू नये.
यासोबतच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेचा बावनकुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. एकनाथ शिंदे हे एनडीए मधील अत्यंत महत्त्वाचे आणि वजनदार नेते आहेत. राज्याच्या प्रलंबित विकासकामांसाठी आणि विविध खात्यांच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी ते दिल्लीला जात असतात. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात केवळ राजकारण शोधणे हे रोहित पवारांच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे. या दौऱ्यांमागे निव्वळ राज्याचा विकास असून त्यात कोणतेही राजकारण नाही, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे, देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांवर बावनकुळे यांनी सरकारची आक्रमक भूमिका मांडली. राज्यात कोणताही देवस्थानविरोधी कायदा येणार नाही. उलट देवस्थानांना अधिक मजबूत करणारा आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा आणण्याचा सरकारचा प्रामाणिक उद्देश आहे. हा मसुदा सध्या सार्वजनिक चर्चेसाठी ठेवला असून, जनतेच्या आणि देवस्थान प्रतिनिधींच्या सूचनांचा आदर केला जाईल, असे सांगत त्यांनी ५ तारखेला राज्यस्तरीय समितीची बैठक घेऊन यावर अंतिम चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.
Eknath Shinde Shivsena : अंतर्गत गटबाजीने नुकसान झाले, आता एकनाथ शिंदे लक्ष घालणार!
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’वरून ग्रामीण मतदारांना आकर्षित करणारी खेळी खेळली. शेत रस्ते मोकळे करण्यासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी मोहिमेत खोडा घालणाऱ्यांवर त्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. ५० शेतकऱ्यांची वाहतूक अडवून राजकारण करणाऱ्या आणि शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांचे ‘ॲग्रो स्टार नंबर’ कायमचे बंद केले जातील आणि पुढील पाच वर्षे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही,” असा कडक इशारा देत बावनकुळे यांनी आगामी काळात या मोहिमेला तीव्र राजकीय स्वरूप येण्याचे संकेत दिले आहेत.








