व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची आरती

Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची आरती

Shivsena protests against load shedding : वीजपुरवठा खंडितप्रकरणी आक्रमक; महावितरणविरोधात आंदोलन

Amravati शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विद्युत भवनाबाहेर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रतिमेची आरती करून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

पावसाळा आणि वादळी वाऱ्यांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच शहर व ग्रामीण भागात कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, ऑनलाइन वर्ग घेणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Sanjay Gaikwad : गायकवाड चौकशीच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ वादाने राजकारण तापले

तक्रार केंद्रात संपर्क साधूनही अनेकदा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत असल्याचे शिवसेनेने सांगितले. काहीवेळा फोन उचलले जात नसल्याने किंवा कर्मचारी अपुरे असल्याचे कारण दिले जात असल्याने ग्राहकांची गैरसोय वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रात्री १० नंतर तक्रार केंद्र बंद राहत असल्याने समस्या अधिक गंभीर बनत असल्याचेही आंदोलकांनी म्हटले आहे.

Sindkhedraja APMC : सभापती-उपसभापतींचे राजीनामे; सिंदखेडराजा बाजार समितीत खळबळ

स्मार्ट मीटर बसविणे आणि वीज कनेक्शन तोडण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध असताना देखभाल व तक्रार निवारणासाठी मनुष्यबळ अपुरे असणे ही गंभीर बाब असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने नमूद केले. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण यंत्रणेची तपासणी करावी, तक्रार निवारणासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, रात्रीही तक्रारी स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!