व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Farmers loan waiver : किडनी घ्या, पण कर्जमाफी द्या! सरसकट कर्जमाफीसाठी युवा...

Farmers loan waiver : किडनी घ्या, पण कर्जमाफी द्या! सरसकट कर्जमाफीसाठी युवा शेतकऱ्याचे अर्धनग्न आंदोलन

Young farmer stages a protest demanding loan waiver : कर्जमाफीच्या अटींवर शेतकऱ्यांचा संताप; स्टॅम्प पेपरवरून शासनाला थेट इशारा

Motala राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींविरोधात मोताळा तालुक्यातील युवा शेतकरी शुभम घोंगटे यांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझी किडनी घ्या, पण शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा,” अशी भावनिक मागणी करत त्यांनी अर्धनग्न अवस्थेत फाटके कपडे परिधान करून स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहित शासनाचा निषेध नोंदविला.

राज्य सरकारच्या नव्या कर्जमाफी निर्णयामध्ये विविध अटी व निकष लादण्यात आल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेप्रमाणे सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असताना नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आशाआकांक्षांवर पाणी फिरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Harshwardhan sapkal : काँग्रेसमध्ये ‘एकच गुन्हा, दोन न्याय’; हर्षवर्धन सपकाळ यांच्या कारवाईवर कार्यकर्त्यांचा थेट सवाल!

आंदोलनादरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शुभम घोंगटे यांनी शासनाच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. “घामाची किंमत देता आली नाही तर रक्ताची किंमत करा. शेती मातीमोल झाली आहे, म्हणून आता स्वतःलाच बाजारात विकायला काढले आहे,” अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचे चित्र मांडले.

शेतीतून मिळणारे उत्पन्न घटत असताना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, डिझेल आणि मजुरीचा खर्च सातत्याने वाढत आहे. त्यातच शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या नावाखाली जाचक अटी लादून शासनाने शेतकऱ्यांना आणखी अडचणीत ढकलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफीसाठीच्या सर्व अटी तत्काळ रद्द करा आणि सरसकट कर्जमाफी लागू करा,” अशी मागणी शुभम घोंगटे व अमोल देशमुख यांनी केली. शासनाविरोधातील हा रोष केवळ एका शेतकऱ्याचा नसून ग्रामीण भागातील हजारो कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मनातील असंतोषाचा आवाज असल्याचे त्यांनी सांगितले.

India gdp : जागतिक संकटांनाही भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार झेप

या आंदोलनात अमोल देशमुख, संतोष पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

error: Content is protected !!