व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election: विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोर्चेबांधणी; बावनकुळेंची राणांच्या कार्यालयात बैठक

Legislative election: विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोर्चेबांधणी; बावनकुळेंची राणांच्या कार्यालयात बैठक

 

Chandrashekhar bawankule hold the meeting at Navneet Rana’s office, interaction with corporators : पालकमंत्र्यांचा नगरसेवकांशी थेट संवाद, अर्धा तास बंदद्वार चर्चा

Amravati आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अमरावतीतील युवा स्वाभिमान पक्षाच्या शंकरनगर येथील कार्यालयाला भेट देऊन महत्त्वपूर्ण बैठक घेतली. युवा स्वाभिमान पक्षाच्या ४८ नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयासाठीची रणनीती आणि मतदानाचे गणित यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान पालकमंत्री बावनकुळे यांनी उपस्थित नगरसेवकांशी थेट संवाद साधत ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट केले. पक्षादेशाचे काटेकोर पालन व्हावे आणि महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनाच मतदान मिळावे, यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांचा पुढाकार, चंद्रपुरात साकारले २९.९९ कोटींचे अत्याधुनिक जीएसटी भवन

भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनीही नगरसेवकांना संबोधित करत प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीमागील महायुतीची भूमिका स्पष्ट केली. महायुतीची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी ही निवडणूक जिंकणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Khadakpurna project : खडकपूर्णेचे पाणी आले अन् श्रेयवाद पेटला; नेत्यांमध्ये रस्सीखेच

मुख्य बैठक संपल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यात सुमारे अर्धा तास बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेत निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन, मतदानाचा कोटा आणि महायुतीच्या विजयासाठीची पुढील रणनीती यावर सखोल विचारविनिमय झाल्याची माहिती मिळाली. या बैठकीमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी आमदार प्रवीण तायडे, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, सुनील राणा, जयंतराव वानखडे, भातकुली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता कोलटेके, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती ॲड. प्रीती रेवणे, झोन सभापती किशोर जाधव, नगरसेवक प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, नंदा सावदे, प्रियंका पाटणे, अर्चना पांडे, योगेश विजयकर, डॉ. मधुरा कहाळे, ऋषीकेश देशमुख, सुमती ढोके, मीरा कांबळे, अजय जयस्वाल, गौरी मेघवानी, रजनी डोंगरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!