व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Eknath Shinde Shivsena : गल्ली ते दिल्ली विस्ताराची मोहीम… शिंदेंच्या सेनेचं चाललय...

Eknath Shinde Shivsena : गल्ली ते दिल्ली विस्ताराची मोहीम… शिंदेंच्या सेनेचं चाललय काय?

Shivsena expansion campaign running all over Maharashtra : ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’; खामगावात सदस्य नोंदणी अभियानाला वेग

Khamgao उद्धवसेनेतील खासदारांना आपल्याकडे वळवून पक्ष मजबूत करण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले आहे. त्याचवेळी गावपातळीवर युवासेनेच्या माध्यमातून संघटनविस्ताराचे अभियानही जोरदार राबविण्यात येत आहे. अलीकडेच युवासेनेने खामगाव येथील आढावा बैठकीत तसा निर्धार केला. त्यामुळे शिंदेंच्या सेनेचे नेमके काय चाललेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

युवा सेना खामगाव शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शनिवारी प्रेम रेसिडेन्सी, खामगाव येथे उत्साहात पार पडली. बैठकीस युवा सेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव व बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव तसेच युवा सेना लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी अभियान तसेच एस.आय.आर. संदर्भातील विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटना अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

Prataprao Jadhav : एससी आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हायलाच हवे; केंद्रीय राज्यमंत्र्याने घेतली भूमिका

यावेळी मार्गदर्शन करताना ऋषी जाधव यांनी, “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावागावात आणि युवकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवा सेना ही केवळ राजकीय संघटना नसून युवकांच्या हक्कांसाठी लढणारी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी काळात सदस्य नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबवून प्रत्येक गावात युवा सेनेचे जाळे निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच युवकांनी सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत संघटना अधिक मजबूत करावी, असेही त्यांनी सांगितले.

Farmers loan waiver : सरसकट कर्जमुक्तीसाठी उध्दव सेनेचे ‘डफडे बजाव’; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

बैठकीस युवा सेना उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय पाटील, तालुकाप्रमुख अमोल फेरंग, तालुकाप्रमुख बहादूर वाघे, शहरप्रमुख राहुल कळमकार, विधानसभा संपर्कप्रमुख सागर गावंडे, तालुका संघटक गोपाल वरणकार यांच्यासह खामगाव तालुका व शहरातील उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत संघटन विस्तार, सदस्य नोंदणी आणि युवकांशी संपर्क वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

error: Content is protected !!