व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation tiger : सहा खासदारांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाविरोधात उद्धवसेनेचे आंदोलन

Operation tiger : सहा खासदारांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाविरोधात उद्धवसेनेचे आंदोलन

Uddhav Thackeray shivsena stages protest against the entry of six MPs into Eknath Shinde Shivsena : अकोल्यात प्रतिकात्मक पुतळा दहन; भाजप व शिंदेसेनेविरोधात घोषणाबाजी

Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार शिंदेसेनेत दाखल झाल्याच्या वृत्तानंतर अकोल्यातील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला.

दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, बंडू उर्फ संजय जाधव आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राज्यभरात उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

OBC protest : ओबीसींच्या सात प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा; 1 जुलैला धरणे आंदोलन

अकोल्यातील आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे शहरप्रमुख (अकोला पश्चिम) आशिष गावंडे यांनी केले. यावेळी आंदोलकांनी संबंधित खासदारांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली. प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवत त्याचे दहन करण्यात आले.

यावेळी बोलताना आशिष गावंडे यांनी भाजपवर टीका केली. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिलांना आरक्षण देण्याच्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ निमित्तमात्र असल्याचाही दावा त्यांनी केला.

Malkapur municipal council : काँग्रेसला घरचा आहेर; सभापतींच्या पतीने नगर परिषदेत टाकला कचरा!

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र विसपुते, जिल्हासंघटक भूषण भिरड, शहरप्रमुख राहुल कराळे, मनपा गटनेते विजय इंगळे, नगरसेवक शंकर लंगोटे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, अभिषेक खरसाडे, किरण अवताडे, साकलेन खान पठाण, दत्ता पाटील, आशु तिवारी, सोनू औतकार, अनिल परचुरे, प्रवीण शिंदे, योगेश गोतमारे, विशाल घरडे, विकी इंगळे, सोनू अत्तरकर, शुभम देशमुख, ऋषी देशमुख, हर्षल पाटील, रामभाऊ आमले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, प्रभागप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!