व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water crisis : पाणी प्रश्नावर जनतेचा एल्गार; मोर्चामुळे प्रशासन व सत्ताधाऱ्यांची झोप...

Water crisis : पाणी प्रश्नावर जनतेचा एल्गार; मोर्चामुळे प्रशासन व सत्ताधाऱ्यांची झोप उडाली!

Public march over the water crisis; administration gives written assurance to resolve the issue within 50 days : महाआक्रोश मोर्चाचा दबाव; ५० दिवसांत तोडगा काढण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन

Malkapur शहरातील भीषण पाणीटंचाई आणि नगरपरिषद हद्दीबाहेर पाईपलाईन टाकून शहराचे हक्काचे पाणी वळविण्याच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी काढलेल्या भव्य महाआक्रोश मोर्चामुळे नगर परिषद प्रशासन, सत्ताधारी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मोर्चाच्या वाढत्या दबावानंतर प्रशासनाने ४० ते ५० दिवसांत समस्यांवर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

मलकापूर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना महिन्यातून केवळ दोन वेळाच पाणीपुरवठा होत आहे. भर उन्हाळ्यात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी ओम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन नागरिकांना एकत्र आणत महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Operation Tiger : गद्दारांना जनता धडा शिकवेल; बुलढाण्यात ठाकरे गटाचा इशारा

मोर्चाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रशासनासह सत्ताधाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त तैनात केला होता. मात्र आंदोलनकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पार पाडत आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू दिले नाही.

मोर्चानंतर आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. यामध्ये नगरपरिषदेच्या निधीतून हद्दीबाहेर नवीन पाईपलाईनचे काम हाती न घेणे, उपलब्ध निधीचा वापर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी करणे, नियमित पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करणे तसेच पाणीपुरवठा क्षमता वाढविण्यासाठी नवीन पंप खरेदी व बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

मुख्याधिकारी संजय केदार यांनी आंदोलनकर्त्यांच्या ११ मागण्यांबाबत लेखी पत्र देत त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असला तरी नागरिकांच्या पाणी प्रश्नावर प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Akola municipal corporation : महासभेतील ठरावाची अंमलबजावणीच नाही, सभापतींनी फटकारले अधिकाऱ्यांना

अखेर मुख्याधिकारी यांनी आंदोलनकर्ते ओम शिंदे व नागरिकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. या आंदोलनामुळे मलकापूरमध्ये पाणी प्रश्नावर जनआंदोलनाची ठिणगी पडली असून नागरिकांच्या दबावापुढे प्रशासनाला झुकावे लागल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

error: Content is protected !!