Uday Samant claims that even if the Shiv Sena (Shinde faction) expands, it will not create rifts within the Mahayuti alliance : शिवसेना (शिंदे गट) वाढला तरी महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही, उद्योगमंत्र्यांचा दावा
Amravati प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. शिवसेना (शिंदे गट) सध्या वेगाने विस्तारत असली, तरी त्यामुळे महायुतीत कोणताही मिठाचा खडा पडणार नाही. महायुतीची एकजूट कायम राखण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला.
अमरावती येथे आयोजित मेळाव्यानिमित्त प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, शुक्रवारी सायंकाळी नागपूरमध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिकृतपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर भाष्य टाळले
Uddhav thackeray : फितुरांच्या फितुरीला जशास तसे उत्तर मिळणार, उद्धव यांचे विदर्भातून आव्हान
महायुतीतील जागावाटप आणि अंतर्गत विषय समन्वयाने सोडवले जातील. प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे; मात्र महायुती अधिक मजबूत करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीवर टीका करताना सामंत म्हणाले, मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला त्यांच्या अनेक आमदारांनी दांडी मारली. यावरूनच आघाडीच्या भवितव्याचा अंदाज येतो. महाविकास आघाडीत आता कोणताही समन्वय उरलेला नसून ती पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित विदर्भ दौऱ्यावरही त्यांनी निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी विदर्भाचा दौरा केला असता, तर त्यातून काही सकारात्मक परिणाम दिसले असते. आता सर्व काही हातातून गेल्यानंतर विदर्भात फिरून काय मिळणार?” असा टोला सामंत यांनी लगावला.








