Eknath Shinde attacks Uddhav Thackeray in Nagpur: काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंनी आधीच हिंदुत्व सोडल्याची टीका
Nagpur जो रामाचा नाही, तो काही कामाचा नाही, हे आता कुठे उद्धव ठाकरे यांना उमगलं आहे. म्हणूनच ते आता रामरक्षा आंदोलन करत आहेत. पण काँग्रेससोबत जाऊन त्यांनी आधीच हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व म्हणजे काही वाटेल तेव्हा घालायला आणि काढायला शर्ट नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नागपुरात जोरदार हल्लाबोल केला.
नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय घडामोडींवर आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांच्यावर दुटप्पा भूमिकेचा आरोप करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज रामरक्षेचा जप करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना थेट जेलमध्ये टाकले होते, हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता त्यांनी कितीही सोंगं घेतली, तरी त्यांचे बेगडी हिंदुत्व जनतेसमोर उघडे पडले आहे.
Rising debt revenue : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ‘कॅग’चा इशारा!
राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना शिंदे यांनी महायुती सरकारची कटिबद्धता जाहीर केली. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा आमच्या बळीराजाचा म्हणजेच शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या मदतीसाठी सरकार कुठलीही कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला. महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, यामध्ये येणारे सर्व तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या सततच्या टीकेचा समाचार घेतला. आमच्या विरोधकांना केवळ टीका आणि आरोप करण्याची सवयच जडली आहे, आम्ही कितीही चांगले काम केले, तरी त्यांचे समाधान कधीच होणार नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणे सोडून थेट जनतेसाठी काम करत आहोत, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर कौतुक केले. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणारे नेते आहेत, इतर विरोधकांसारखे ते पूर्वग्रहदूषित नाहीत, असे सांगत पवारांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाची प्रशंसा करून विरोधकांनाच चोख उत्तर दिल्याचे शिंदे म्हणाले.
Parth Pawar : पवार कुटुंबात पुन्हा लगीनघाई! पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार विधानभवनात आले असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाला भेट दिली होती. या भेटीमुळे ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी, गद्दारांना बळ देऊ नका, अशी जळजळीत आणि संतप्त प्रतिक्रिया या भेटीवर दिली होती. मात्र, संजय राऊत यांच्या या जहरी टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. शिंदेंनी राऊतांच्या टीकेला पूर्णपणे डावलून, थेट कामातून आणि पवारांच्या कौतुकाचा दाखला देत ठाकरे गटाला मोठा राजकीय शह दिला आहे.








