व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Chandrashekhar bawankule : देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहणार’; संजय राऊतांच्या दाव्यावर...

Chandrashekhar bawankule : देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहणार’; संजय राऊतांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे चोख उत्तर

Devendra Fadnavis will serve as a chief minister till 2034, Chandrashekhar bawankule claims after Sanjay Raut’s statement: फडणवीस दिल्लीला जातील ही बिनबुडाचा अफवा असल्याचा दावा

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील आणि त्यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. तसेच भाजप कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार नाही, असे भाकीतही त्यांनी वर्तविले होते. संजय राऊत यांच्या या विधानामुळे कालपासूनच राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद पेटला आहे.

मात्र, स्वतः महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर तातडीने स्पष्टीकरण देत विरोधकांचे दावे फेटाळून लावले आहेत. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, राज्याला विकासाच्या मार्गावर नेणारे, दूरदृष्टी असलेले आणि अष्टपैलू नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प आणि लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. सध्या राजकीय वर्तुळात अफवांचा बाजार गरम असून, फडणवीस दिल्लीत जाणार ही अशीच एक बिनबुडाची अफवा पेरली गेली आहे. एक सत्य सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे की, महाराष्ट्राचे ‘इन्फ्रामॅन’ देवेंद्र फडणवीसजीच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, हीच महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनीही बावनकुळे यांना शुभेच्छा देत, ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

Pankaj bhoyar : पाकिस्तानी दहशतवाद्याचा मोठा कट उधळला; १५७ ठिकाणी छापे, १०० संशयित ताब्यात

देशातील जनगणनेसोबत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना का केली जात नाही, याचा जाब बावनकुळे यांनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाला विचारावा, असे आवाहन करत काँग्रेसने बावनकुळेंना पहिले पत्र पाठवून आपल्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. आता संजय राऊत यांनी त्यापुढे जाऊन स्वतः फडणवीस महाराष्ट्रातून जाताना बावनकुळे यांना आपला उत्तराधिकारी निवडणार असल्याचे भाकीत वर्तविले आणि सोबतच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघू नयेत कारण त्यांची प्रतिमा डागाळलेली आहे, अशी टीकाही केली. दरम्यान, या संपूर्ण वादावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी परवाच दिल्लीत जाऊन आलो आहे असे मिश्किल वक्तव्य करत विरोधकांच्या दाव्यातील सर्व हवा काढून घेतली आणि या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आरोप-प्रत्यारोपांमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

error: Content is protected !!