व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sanjay Raut: कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी लुटीची जबाबदारी घ्यावी, संजय राऊतांचा थेट हल्ला

Sanjay Raut: कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी लुटीची जबाबदारी घ्यावी, संजय राऊतांचा थेट हल्ला

Sanjay Raut attacks Ayodhya ram mandir treasurer govindgiri maharaj, challenges to take responsibility of theft : अयोध्या मंदिरावर भाजपचेच नियंत्रण

Nagpur अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी कोट्यवधी हिंदूंनी संघर्ष केला आणि शेकडो रामभक्तांनी बलिदान दिले. अशा पवित्र मंदिरात कोट्यवधी रुपयांचा दरोडा पडला असताना, मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज मी राजीनामा देणार नाही असे सांगत सुटले आहेत, हे दुर्दैवी आहे. आम्ही त्यांचा राजीनामा मागितलाच नव्हता; पण कोषाध्यक्ष या नात्याने मंदिरातील चोरी आणि लुटमार रोखण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांचीच होती. त्यामुळे त्यांनी या कोट्यवधींच्या लुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारायलाच हवी, असा घणाघाती हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नागपुरात चढवला.

अयोध्या राम मंदिर कथित घोटाळ्याप्रकरणी ‘एसआयटी’ तपास सुरू असताना राऊत यांनी थेट कोषाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले आहे.

गोविंदगिरी महाराज यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेताना संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराज म्हणतात की ते पुण्यातून ‘सीए’ पाठवून मंदिराचा कारभार पाहत होते. पण हा पुण्यात बसून कारभार पाहण्याचा विषय नाही. कोषाध्यक्ष म्हणून तिथे प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे हे त्यांचे कर्तव्य होते.

Sanjay Raut: सच्चे रामभक्त असाल तर या; संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

मंदिराचा सर्व कारभार भाजपच्या नियंत्रणातून चालत असल्याचा आरोप करत राऊत यांनी, भाजपला जर राम मंदिराचा कारभार नीट करता येत नसेल, तर तो आमच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी लोकांकडे सोपवावा, असे थेट आव्हान दिले. चोरांच्या हातात चाव्या आहेत आणि चोरांच्याच मनात चांदणे आहे, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी भाजप आणि मंदिर प्रशासनाला धारेवर धरले.

Uddhav Thackeray: संघाच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची वज्रमूठ ; नागपुरात ८ हजार शिवसैनिक करणार रामरक्षा पठण

या संपूर्ण प्रकरणात रामभक्तांचा घोर अपमान केला जात असल्याचे सांगत संजय राऊत यांनी नागपुरातील रामरक्षा पठण उपक्रमाचे जोरदार समर्थन केले. मंदिरात होणाऱ्या या लुटीविरोधात आवाज उठवण्यासाठीच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व रामभक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, असे स्पष्ट करत राऊत यांनी, आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे, आता यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, असे सांगत गोविंदगिरी महाराज आणि भाजप सरकारला एकाच वेळी कोंडीत पकडले.

error: Content is protected !!