व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा...

Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल

Objectionable Instagram comment against former MP Navneet Rana; police register a case : दोन धर्मांत तेढ निर्माण केल्याचा आरोप; खोलापुरी गेट पोलिसांची कारवाई

Amravati : सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी एका युजरविरोधात खोलापुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता महाजनपुरा गेट परिसरातील रहिवासी चंद्रशेखर मधुकरराव जावरे (वय ५२) हे घरी असताना इन्स्टाग्राम रील्स पाहत होते. त्यावेळी त्यांना एका इन्स्टाग्राम आयडीवरील व्हिडिओ दिसला. संबंधित व्हिडिओमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक

तक्रारीनुसार, संबंधित सोशल मीडिया युजर समाजमाध्यमांच्या माध्यमातून दोन धर्मांमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!