Vijay Wadettiwar invites Pankaja Munde to quit the BJP, join the Congress, and become Chief Minister : पक्षात अन्याय होत असल्याची भावना मुंडेंमध्ये निर्माण झाल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा
Nagpur भारतीय जनता पक्षांतर्गत ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असून पक्षात डावलले जात असल्याच्या चर्चेदरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. पक्षात सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे जर निवृत्ती घेण्याचा विचार मनात येत असेल, तर भाजप सोडून काँग्रेसमध्ये या आणि मुख्यमंत्री व्हा, अशी साद वडेट्टीवारांनी घातल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण खात्याची जबाबदारी स्वीकारली असली, तरी त्या फारशा अनुकूल नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
Election commission : ४७,८२० मतदारांचे पत्ते गायब; विशेष पुनरीक्षण मोहिमेसमोर मोठे आव्हान
मी जनतेची मुख्यमंत्री आहे, असे सांगत त्या आपल्या भावना व्यक्त करत असतात. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांचा रोष प्रकर्षाने समोर आला होता. पक्षात पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना विधान परिषदेवर घेतले आणि पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली, परंतु हे खाते फारसे महत्त्वाचे नसल्याने त्या आपली नाराजी जाहीरपणे किंवा भाषणातून व्यक्त करत असतात.
अलीकडेच झालेल्या समाजबांधवांच्या मेळाव्यात, ‘आता राजकारणातून निवृत्ती घ्यावीशी वाटते, असे विधान करत त्यांनी आपली अंतर्गत सल व खदखद बाहेर काढली होती. पंकजा मुंडे यांच्या याच उद्वेगाची आणि नाराजीची दखल घेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा राजकीय डाव टाकला आहे. भाजपमध्ये ओबीसी समाजावर सातत्यााने अन्याय केला जात असून ओबीजी नेत्यांना पद्धतशीरपणे संपवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या समृद्धी महामार्गाच्या विस्ताराला विदर्भातूनच विरोध
पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण देत वडेट्टीवारांनी एकप्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे. या राजकीय घडामोडीमुळे आगामी काळात महायुतीत नव्याने वादंग पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








