व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Congress : अकोला काँग्रेसचा ‘सोशल अजेंडा’!; शहर काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

Akola Congress : अकोला काँग्रेसचा ‘सोशल अजेंडा’!; शहर काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

Akola congress formed new city executive body : प्रदेश काँग्रेसची मंजुरी; विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व

Akola महानगर काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मंजुरी दिली असून, सर्वसमावेशक विचारातून विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी कपिल वसंतराव रावदेव, आझाद खान, मो. शकील अब्दुल खलील, हरीश कन्हैयालाल कटारिया, मो. फैजल मो. करीम, विजय रामनिवास तिवारी, बाळासाहेब (नंदकिशोर) काळे, राजेश मते, इलियास खान, अय्युब खान आणि ॲड. परवेज डोकाडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी ॲड. संतोष गोळे यांची निवड करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी योगेश पाटील, विलास गोतमारे, डॉ. नितीन देशमुख, पराग कांबळे, जयकुमार वाठूरकर, इस्माईल टीव्हीवाले, विनोद मराठे, श्रीकांत सरोदे, मनीष मिश्रा, राहुल सारवान, मो. इरफान, जुबेर सिंघानिया आणि रफीक कुरेशी यांना संधी देण्यात आली आहे.

Nagpur municipal corporation: उंच इमारतींच्या टेरेसचा गैरवापर; नागपूर महापालिकेची कारवाई, ७ सर्वेक्षण पथके नेमली

तसेच सचिवपदी मोईन खान, अमीनूर रहमान खान, महेंद्र सत्याल, रवी पाटणे, गणेश ताले, दीपक गवई, शशिकांत मिसाळ, हर्षदीप कांबळे, मंजूर रहमान, गोपाल चव्हाण, सोहेल खान, शेख जाकीर, किशोर आरूडकर, रफीउल्ला खान, यशोदा गायकवाड, तौफिक शेख, सैयद यासीन आणि रब्बानी शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसिद्धीप्रमुखपदी समीरसिंग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Graduate constituency election: शिक्षक भारतीकडून अतुल देशमुख यांची उमेदवारी जाहीर; विद्यमान आमदार अभिजित वंजारींशी होणार थेट लढत

नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल. तसेच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देत पक्षाची विचारधारा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते सक्रियपणे काम करतील, असा विश्वास महानगर काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र गवई यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!