व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या अकोल्यातील तक्रारी पोहोचल्या केंद्रात

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या अकोल्यातील तक्रारी पोहोचल्या केंद्रात

Union minister holds meeting in Delhi for complaints in Jal Jeevan Mission in Akola : पाणीपुरवठा, घरकुल व स्वच्छता अभियानातील अडचणी मंत्र्यांसमोर; ठेकेदारांच्या तक्रारींचीही दखल

Akola ‘हर घर जल’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील खासदारांची बैठक झाली. या बैठकीत ग्रामीण भागातील जल जीवन मिशन, घरकुल योजना आणि स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.

अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला जिल्ह्यात या योजनांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या विविध अडचणी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

Nashik earthquake : भूकंपाच्या धक्क्याने नाशिक पुन्हा हादरलं !

अकोल्यातील तक्रारी केंद्रीय मंत्र्यांसमोर

अकोला जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणींसोबतच योजनेतील कथित गैरप्रकार आणि एकाच ठेकेदाराकडून विविध ठिकाणी कामे केली जात असल्याच्या तक्रारीही खासदार धोत्रे यांनी मांडल्या. या बाबींवर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दिल्याचे धोत्रे यांनी सांगितले.

जल जीवन मिशन, घरकुल योजना आणि स्वच्छता अभियान या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयासोबत स्थानिक पातळीवरील यंत्रणांची कार्यक्षमता महत्त्वाची असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Sharad Pawar : महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद?

प्रलंबित विकासकामांवरही चर्चा

बैठकीनंतर खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांसंदर्भातही केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. केंद्राच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळाल्यास जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन, घरकुल आणि स्वच्छता अभियान या योजनांचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ होत आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याची आवश्यकता आहे,” असे धोत्रे यांनी सांगितले.

जल जीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर जल’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा असून, आता केंद्राकडून मिळणाऱ्या निधी आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे अकोलाकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!