व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Shivsena supreme court hearing: एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाकडून मुख्यमंत्री झाले? धनुष्यबाण उद्धव...

Shivsena supreme court hearing: एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाकडून मुख्यमंत्री झाले? धनुष्यबाण उद्धव सेनेला द्या किंवा गोठवा

Give the party symbol to the Uddhav Thackeray shivsena or freeze it, Kapil Sibal argues before the Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा ठाकरे सेनेकडून घणाघाती युक्तिवाद

New delhi शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, ते नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाकडून मुख्यमंत्री झाले असा थेट सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला द्या किंवा ते गोठवा, अशी आक्रमक मागणी न्यायालयासमोर मांडली.

‘शिवसेना कुणाची’ यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाचा दावा पूर्णपणे तकलादू ठरवला. सिब्बल म्हणाले, आमदार असो वा नसो, राजकीय पक्षाची अधिकृत नोंदणी निवडणूक आयोगाकडे असते. एकही आमदार निवडून आला नाही तरी पक्षाचे अस्तित्व कायम राहते. विधिमंडळ पक्ष केवळ विधानसभेच्या कामकाजाच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार होतो. विधिमंडळ पक्ष तिकीट वाटप करत नाही किंवा निवडणुका लढवत नाही. त्याची भूमिका केवळ निवडणुकांनंतर ठरते.

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी उचलला गैरफायदा !

 

युक्तिवाद पुढे नेताना सिब्बल यांनी स्पष्ट केले की, शिंदे जेव्हा आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा ते शिवसेनेतच होते आणि ‘धनुष्यबाण’ हेच त्यांचे चिन्ह होते. तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन नगरविकास खाते सोपवले होते. यावरून मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असल्याचे सिद्ध होते.

तसेच, विधानसभा अध्यक्षांनी पक्षपात करत केवळ संख्याबळाच्या आधारावर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्याचा घेतलेला निर्णयही बेकायदेशीर आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह तात्काळ ठाकरेंना द्या किंवा ते गोठवून टाका, अशी विनंती त्यांनी केली.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही धनुष्यबाणावर आमचाच कायदेशीर हक्क आहे असा पुनरुच्चार केला आहे. दुसरीकडे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, न्यायालयात सध्या फक्त ठाकरे गटाचा एकतर्फी युक्तिवाद सुरू आहे. शिंदे सेनेची बाजू अद्याप मांडायची बाकी असून, ती मांडल्यानंतरच शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा यावर योग्य तो निर्णय होईल.

error: Content is protected !!