व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Akola-Khandwa railway track : अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; मार्च २०२७...

Akola-Khandwa railway track : अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; मार्च २०२७ चे टार्गेट!

Akola–Khandwa railway line work in final stage; broad-gauge conversion targeted for completion by March 31, 2027 : ब्रॉडगेजचे ६० टक्क्यांहून अधिक काम; ६.७ किमीच्या जुळ्या बोगद्यांचे काम सुरू

Akola अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ३१ मार्च २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि आदिवासी पट्ट्याला मध्य प्रदेशासह देशातील विविध राज्यांशी जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने सहकार्य केले आहे.

Ramai Awas Yojana : घरकुलाच्या निधीतून वाहन खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापर, आता जुन्या फाइल्स उघडणार!

अकोला-अकोट (४३ किमी) मार्गाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, या मार्गावर रेल्वे सेवा सुरू आहे. विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. खंडवा-आमला खुर्द (५४ किमी) मार्गाचे कामही पूर्ण झाले असून, तापी नदीवरील मोठ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर मालगाडीचा लोड टेस्टही यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.

प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक टप्पा असलेल्या अकोट-हिवरखेड-सोनाळा-जळगाव जामोद-तुकाईथड-आमला खुर्द या नवीन अलाइनमेंटवर डोंगर पोखरून ६.७ किमी लांबीच्या जुळ्या बोगद्यांचे (ट्विन टनेल) काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Devendra Fadnavis: संविधानाची ताकद अन् युवकांच्या ऊर्जेने कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, फडणवीसांचा ‘जेन Z’ सोबत संवाद

प्रकल्पाचे एकूण ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, उर्वरित ट्रॅक टाकणे, पूल, माती भराव आणि नवीन स्थानक इमारतींची कामे वेगाने सुरू आहेत. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर आदिवासी भागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला

error: Content is protected !!