व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Uddhav Thackeray : तरुण पदाधिकाऱ्यांकडे सोपवले लोकसभा मतदारसंघ; ठाकरेंची शिवसेना लागली कामाला

Uddhav Thackeray : तरुण पदाधिकाऱ्यांकडे सोपवले लोकसभा मतदारसंघ; ठाकरेंची शिवसेना लागली कामाला

shivsena-ubt-loksabha-samparkpramukh-list-2029-uddhav-thackeray : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी; नागपूरसह ४० मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर

Mumbai : आगामी २०२९ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील ४८ पैकी ४० लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाकडून संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आमदार, माजी नगरसेवक आणि पक्षातील तरुण पदाधिकाऱ्यांवर विविध लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पक्षाने मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे आणि जळगाव वगळता इतर मतदारसंघांमध्ये संपर्कप्रमुख निश्चित केले आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघनिहाय संघटन मजबूत करणे, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे तसेच पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या संपर्कप्रमुखांवर असणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या यादीत कल्याण-भिवंडीची जबाबदारी वरुण सरदेसाई, शिर्डी-अहिल्यानगरची सुनील शिंदे, छत्रपती संभाजीनगरची आशीष चेंबुरकर, शिरूरची किरण तावडे, पुणे जिल्ह्याची सचिन पडवळ आणि सोलापूर-माढाची जबाबदारी सुषमा अंधारे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Election Commission : महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना नोटिसा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नाशिक-दिंडोरीसाठी रविंद्र मिर्लेकर, बुलढाण्यासाठी नितीन देशमुख आणि नरेंद्र खेडेकर, अकोल्यासाठी नितीन देशमुख आणि नीलेश घुमाळ, अमरावतीसाठी नितीन देशमुख आणि डॉ. किशोर ठाकरे, हिंगोलीसाठी बबनराव थोरात, कोल्हापूरसाठी अरुण दुधवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारामतीची जबाबदारी संजय सावंत, धुळ्याची अशोक धात्रक, रावेरची गुलाबराव वाघ, नंदुरबारची मुकेश साळुंके, रत्नागिरी-सिंधुदुर्गची प्रदीप बोरिकर, रायगडची संजय मानाजी कदम आणि मावळची प्रसाद भोईर यांच्याकडे देण्यात आली आहे. पालघरमध्ये विलास पोतनीस, साताऱ्यात उदय ढळवी, सांगलीत स्वप्नील कुंजीर, हातकणंगलेमध्ये महेंद्र इंदुलकर, जालन्यात सुनील वामन पाटील आणि धाराशिवमध्ये सुनील काटमोरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Manoj Jarange : आंदोलनाची धग राज्यभर; सरकारचा संयमाचा सूर, तर जरांगेंचा आक्रमक पलटवार

नांदेडसाठी किशोर पोतदार, परभणीसाठी प्रदीपकुमार खोपडे, लातूरसाठी परमेश्वर सातपुते, बीडसाठी अशोक सकपाळ, यवतमाळ-वाशिमसाठी दिलीप जाधव, वर्ध्यासाठी सुधीर सूर्यवंशी, नागपूरसाठी सतीश हरडे, रामटेकसाठी सुरेश सावंत, गडचिरोली-चिमूरसाठी महेश केदारी, चंद्रपूरसाठी प्रशांत कदम आणि भंडारा-गोंदियासाठी राजू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या संघटनात्मक तयारीसोबतच उद्धव ठाकरे यांनी सरकारवरही जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी परीक्षा आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले. एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने प्रश्न सुटत नाही, तर जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Mundhwa land Scam : पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारावर हायकोर्टाचा सवाल

फोडाफोडीच्या राजकारणावरही ठाकरेंनी निशाणा साधला. आमदार फुटले की सुरत-गुवाहाटीला जातात; मात्र पेपर फुटल्यास विद्यार्थ्यांनी न्याय मागण्यासाठी कुठे जायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या राजकीय वातावरणावर बोचरी टीका करत, ज्यांची स्वतःची मनोवृत्तीच फुटलेली आहे, ते राज्याचा कारभार काय करणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या निश्चित केल्याने निवडणुकीच्या तयारीला पक्षाने आतापासूनच वेग दिल्याचे स्पष्ट होत आहे.

error: Content is protected !!