व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rohit Pawar: एसआयटी म्हणजे सरकारचा इंटरेस्टेड टाईमपास; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर रोहित पवारांचा घणाघात

Rohit Pawar: एसआयटी म्हणजे सरकारचा इंटरेस्टेड टाईमपास; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर रोहित पवारांचा घणाघात

SIT is nothing but the government’s ‘interested timepass’; Rohit Pawar criticises the Chief Minister’s announcement : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा

Nagpur एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटीवर विद्यार्थ्यांचा तीव्र रोष शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या विशेष तपास पथकाच्या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एसआयटी म्हणजे सरकारचा ‘इंटरेस्टेड टाईमपास, अशी खोचक व्याख्या करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची खिल्ली उडवली असून, एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा दिला आहे.

एमपीएससी पेपरफुटीनंतर पुणे, नागपूरसह राज्यभरात विद्यार्थ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. विरोधकांकडून एमपीएससीचे अध्यक्ष भीमणवार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली जात असताना, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी मुंबईत विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली. त्याऐवजी, लेंडवे, मराठे आणि नखाते या पूर्वीच्या अध्यक्षांच्या काळातील परीक्षांची एसआयटी चौकशी, औषध निरीक्षक परीक्षा घोटाळ्याचा तपास, सनदी अधिकारी श्रीमती व्ही. राधा यांच्या नेतृत्वात सुधारणा समिती, तसेच पोलीस भरती व इतर परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या विविध उपायांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
मात्र, नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे हे सर्व निर्णय आणि आश्वासन म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे म्हटले.

Uddhav Thackeray Shivsena: मुंबईचेच वर्चस्व कायम; हरडे व सूर्यवंशी यांचा अपवाद वगळता विदर्भाच्या शिवसैनिकांचा भ्रमनिरास

विद्यार्थ्यांचा रोष शांत करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची ही घोषणा पूर्णपणे फसवी आहे. यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणांत अशाच एसआयटी चौकशीच्या घोषणा केल्या होत्या, पण त्या तपासांचे पुढे काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Uday Samant : उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला; ‘टीका करण्यापेक्षा संयम ठेवून काम करा’

एमपीएससीचे अध्यक्ष भीमणवार यांच्यावर कारवाई न करता सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत, केवळ घोषणांचा पाऊस पाडून विद्यार्थ्यांची दिशाभूल करता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी कितीही घोषणा केल्या तरी एमपीएससीविरोधातील विद्यार्थ्यांचे आणि विरोधकांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

error: Content is protected !!