व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Raut Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानेच धनुष्यबाण शिंदेंना;...

Sanjay Raut Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानेच धनुष्यबाण शिंदेंना; संजय राऊत यांचा दावा

Sanjay Raut claims the party symbol was given to Eknath Shinde on Home Minister Amit Shah’s orders : निवडणूक आयोग केंद्र सरकारचा ‘घरगडी’ झाल्याची टीका

Mumbai केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर आणि आदेशावरूनच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोग हा अमित शहांचा ‘घरगडी’ झाला आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सध्या सर्वोच्च न्यायालयात ‘शिवसेना नेमकी कोणाची?’ यावर अंतिम सुनावणी सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडताना आयोगाचा निर्णय चुकीचा असून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तत्काळ गोठवण्याची (Freeze) मागणी केली आहे.

Nana Patole : सरकारला जाग का येत नाही? दुष्काळाच्या मागणीत राजकारण कुठे आले?

दुसरीकडे, शिंदे गटाच्या वतीने न्यायालयात बचाव करताना लोकप्रतिनिधींचे संख्याबळ आणि मिळालेल्या मतांच्या टक्क्यांवरून निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय कायदेशीर आणि योग्यच असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, कोणता पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाला द्यायचे, याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगालाच असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

शिंदे गटाच्या याच दाव्याचा जोरदार समाचार घेताना संजय राऊत यांनी केंद्रीय सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल केला. “अमित शहा यांच्याच आदेशावरून निवडणूक आयोगाने पक्षातील फोडाफोडीला खतपाणी घातले आणि शिंदे गटाला अधिकृत मान्यता दिली,” असा पुनरुच्चार करत त्यांनी आयोगाच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुप्रीम कोर्टातील या महत्त्वाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

error: Content is protected !!