व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Lakhe Patil : विखे पाटलांनी जरांगेंना रुग्णालयात जाऊन ‘हप्ता’ दिल्याचा दावा

Sanjay Lakhe Patil : विखे पाटलांनी जरांगेंना रुग्णालयात जाऊन ‘हप्ता’ दिल्याचा दावा

manoj-jarange-patil-sanjay-lakhe-patil-radhakrishna-vikhe-patil-eknath-shinde-controversy : डॉ. संजय लाखे पाटील यांचे गंभीर आरोप; शिंदेंविरोधातील वक्तव्याने वातावरण तापले

Jalna : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे नेते एकनाथ शिंदे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांना ‘हप्ता’ दिला आणि त्यांच्या सांगण्यावरूनच जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बदनामीची ‘सुपारी’ घेतल्याचा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे. हे आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील आणि गरीब मराठा समाज यांच्यातील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला. हैदराबाद गॅझेटच्या मुद्द्यावर सरकारला वेळ देण्यात आला, मात्र त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. जरांगे पाटील हे शिंदे यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेत असल्याचेही लाखे पाटील यांनी म्हटले.

Chandrashekhar Bawankule : ‘याद राखा, हे सीएमच्या मामांचं गाव आहे’; महावितरणच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे खडेबोल

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या काही सहकाऱ्यांची आयकर विभागाकडून चौकशी होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे सांगत त्यांनी या कारवाईमागे एकनाथ शिंदे यांचा हात असल्याचा आरोप केला. मराठा आंदोलनाशी संबंधित व्यक्तींवर चौकशीचा दबाव आणला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. जरांगे पाटील यांनी सरकार आणि सत्ताधाऱ्यांना उद्देशून, आंदोलनकर्त्यांच्या चौकशा केल्या तरी आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. सत्ता कायमस्वरूपी कोणाच्या हातात राहत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, आपल्याशी राजकीय मैत्री केली नाही म्हणून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Uddhav Balasaheb Thackeray : वाशिममध्ये उद्धवसेनेचा शेतकरी आक्रोश मोर्चा; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

याच पार्श्वभूमीवर लाखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आव्हान दिले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाभोवती सुरू असलेला राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या संपूर्ण प्रकरणात विखे पाटील, जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या किंवा त्यांच्यावर करण्यात आलेल्या दाव्यां मुळे राजकीय वातावरण तापले आहे.

error: Content is protected !!