व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र प्रशासन सुस्त, मुनगंटीवार चुस्त!

प्रशासन सुस्त, मुनगंटीवार चुस्त!

बल्लारपूरच्या लॉटिंग गँगच्या मजुरांची पाच महिन्यांची थकीत मजुरी अदा; दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा

Chandrapur – बल्लारपूर येथील लॉटिंग गँगच्या मजुरांची एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची मजुरी थकीत असतानाही प्रशासकीय स्तरावर या प्रश्नाच्या निपटाऱ्यासाठी अपेक्षित हालचाली होत नव्हत्या. वारंवार प्रतीक्षा करूनही मजुरी मिळत नसल्याने मजुरांमध्ये नाराजी वाढत होती. दसऱ्याचा सणही मजुरीविना गेल्यानंतर दिवाळीही आर्थिक विवंचनेत जाण्याची चिन्हे होती. मात्र, प्रशासनाच्या संथ कार्यपद्धतीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट हस्तक्षेप करत प्रश्नाला गती दिली. त्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, संबंधित मंत्र्यांकडे विषय मांडला आणि थकीत मजुरी तातडीने देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा हलवली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची थकीत मजुरी मजुरांना प्राप्त झाली असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध झाली आहे. प्रशासनाच्या संथ गतीमुळे रखडलेला प्रश्न मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे दिवाळीपूर्वी मार्गी लागला.

बल्लारपूर येथील वाहतूक विपणन विभागांतर्गत डेपोमध्ये कार्यरत असलेल्या लॉटिंग गँगच्या मजुरांची मजुरी प्रलंबित असल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. मजुरी मिळत नसल्याने आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मजुरांनी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. दुबे यांनी ही बाब आ. मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून थकीत मजुरी तातडीने अदा करण्याची मागणी केली. तसेच वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

पराभवाची संपूर्ण जबाबदारी बावनकुळेंनी स्वीकारली; चूक सुधारून आत्मचिंतन करणार

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची थकीत मजुरी अदा करण्याबरोबरच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध करून देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली होती. दिवाळीपूर्वी मजुरांच्या हातात त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. या हस्तक्षेपानंतर थकीत मजुरीची रक्कम प्राप्त झाली असून पुढील दोन महिन्यांची मजुरीही उपलब्ध झाली आहे.

निवडणूक सरनाईकांची, चर्चा मात्र राणा-कडूंच्या मैत्रीची

दरम्यान, मजुरी थकीत राहिल्यामुळे मजुरांच्या कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि सणासुदीच्या गरजांसाठी मजुरीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबांना दिवाळीच्या काळात पैशांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता थकीत मजुरी मिळाल्याने या मजुरांना दिलासा मिळाला आहे. कामाचा मोबदला वेळेवर मिळावा, अशी अपेक्षा मजुरांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!