Breaking

Akola police : अकोला जिल्हा पोलीस सीसीटीएनएस रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर

 

Akola District Police ranked second in CCTNS ranking : अमरावती परिक्षेत्रात प्रथम स्थान मिळवत उल्लेखनीय यश

Akola अकोला जिल्हा पोलीस दलाने क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (CCTNS) कार्यप्रणालीत उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक तर अमरावती परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता आणि गतिशीलता यावी यासाठी सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे गुन्ह्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते, तसेच देशपातळीवरील गुन्हे आणि माहितीही उपलब्ध होते. ई-तक्रार नोंदणी, अनोळखी मृतदेह शोध, गुन्हे प्रतिबंध, वाहन पडताळणी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरते.

Nana Patole : नाना पाटोलेंच्या राजीनाम्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी काय केले?

 

सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांपासून ते तपास आणि दोषारोपपत्र सादर करण्यापर्यंतच्या १८ प्रकारच्या माहितीची नोंद केली जाते. या प्रणालीतील कार्यक्षमता प्रत्येक महिन्याला गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडून तपासली जाते.

डिसेंबर २०२४ च्या अहवालात अकोला जिल्ह्याची उज्ज्वल कामगिरी

नोव्हेंबर २०२४ मध्ये अकोला जिल्ह्याने राज्यस्तरीय क्रमवारीत १२वा क्रमांक मिळवला होता. मात्र, डिसेंबर २०२४ महिन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जिल्हा पोलीस दलाने ४६ घटकांपैकी २०१ पैकी १९७ गुण (९८.०१%) मिळवत महाराष्ट्रात दुसरे स्थान मिळवले. तसेच अमरावती परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा पोलीस दलाने प्रतिष्ठा वाढवली आहे.

Tribal Pilgrims : कचारगड यात्रेवर CCTV ची नजर!

या यशामध्ये पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, नोडल अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील, पोहेकॉ सतिश भातखडे, निखिल सावळे, पोकॉ शुभम सुरवाडे आणि मपोका वैशाली काळपांडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच पोलीस ठाणे आणि उपविभागीय स्तरावरील सीसीटीएनएस अंमलदारांचाही या यशात मोठा वाटा आहे.