Companies should run their machinery on biofuel : पायाभूत विकास आणि बांधकाम क्षेत्राला गडकरींचे आवाहन
Nagpur पायाभूत विकास तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या उद्योगांनी पेट्रोल आणि डिझेल ऐवजी जैवइंधन तसेच विद्युत उर्जेवर संचालित मशिनरी विकसित करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – एमआयडीसीच्या बुटीबोरी येथील औद्योगिक क्षेत्रांमध्ये जीएमएमसीओ कॅट या पायाभूत सुविधा आणि खनन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या एकात्मिक सुविधेचे तसेच तंत्रज्ञान दिवस 2025 चे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकरी हा अन्नदाता आहे. परंतु आता कृषीचे वैविध्यकरण हे इंधन आणि ऊर्जा या क्षेत्रात होणे आवश्यक आहे. शेतकरी हा अन्नदाता सोबतच ऊर्जादाता झाला पाहिजे, असं गडकरी म्हणाले. नागपूर येथे नव्याने स्थापित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर येथील पहिले विमान हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो एविएशन इंधनानेच Bio aviation fuel भरारी घेईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
Nitin Gadkari to Vidarbha Farmers : कोल्हापूरला शक्य आहे, मग विदर्भाला का नाही?
सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड WCL – वेकोलीने एलएनजी संचालित ट्रकचा वापर सुरू केला. त्यामुळे कोळसा वाहतुकीच्या खर्चामध्ये 50 टक्क्यांनी कपात झाली. नागपुरातील काही खाजगी उद्योगांनी देखील एलएनजीचे प्रकल्प स्थापित केले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली .
Rajesh Dharmani, Anees Ahmed : काँग्रेसचे मंत्री म्हणतात, गडकरी ‘रोल मॉडेल’!
जीएमएमसीओ GMMCO कॅटच्या बुटीबोरी मधील एकात्मिक सुविधेमुळे 3000 युवकांना रोजगार मिळणे ही समाधानकारक बाब असल्याचे देखील गडकरी म्हणाले. रोजगार देताना येथील स्थानिक युवकांचा विचार कंपन्यांनी करावा. तसेच त्यांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार द्यावा. प्रशिक्षित मनुष्यबळ या कंपन्यांसाठी एक संपत्ती असेल असे देखील गडकरी म्हणाले.