Indian Railway : अचलपूर-अमरावती मार्गावर ‘शकुंतला’ रेल्वेसाठी रास्ता रोको

 

Roadblock for ‘Shakuntala’ train on Achalpur-Amravati route : शकुंतला रेल बचाव समितीचे आंदोलन, नागरिकांचे आमदारांना साकडे

Amravati महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ‘आझाद देश की गुलाम’ शकुंतला रेल्वेच्या पुनर्बहालीसाठी अचलपूर-अमरावती मार्गावर शकुंतला रेल बचाव समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व सामान्य नागरिकांना सुलभ दळणवळणासाठी शकुंतला रेल्वे सुरू करण्यात यावी. या मागणीसाठी रेल बचाव सत्याग्रह समिती गेल्या सात वर्षांपासून संघर्ष करत आहे.

याच पार्श्वभूमीवर रविवारी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून सकाळी १० वाजता अमरावती-परतवाडा मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शकुंतला रेल बचाव समितीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यामध्ये योगेश खानझोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, शारदा उईके, उज्ज्वला माकोडे, कचरूसेठ पटवारी यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

Nitin Gadkari : गावांच्या समस्या सोडविणारे ‘प्रयोग’ करा!

आंदोलन सुरू असतानाच आमदार प्रवीण तायडे यांचे वाहन रोखण्यात आले. रेल बचाव समितीने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देत त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली. यावर आमदार तायडे यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची मला चिंता नाही, ओबीसींचे रक्षण महत्वाचे !

या वेळी कुंदन यादव, विशाल काकड, रूपेश ढेपे, प्रवीण तोंडगावकर, नीलेश सातपुते, गिरीश भोयर, राजेश अग्रवाल, राजकुमार बरडिया, कमल केजरीवाल, संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे, वसंत धोबे, रामदास मसने, दयाराम चंदेल, शंकर बारखडे, नवीन प्रजापती, संतोष भालेराव, बाल्या उदापूरकर, संतोष नरेडी, राजेश पांडे आदी उपस्थित होते.