Breaking

Shivsena, Congress : बुलढाण्यात महाविकास आघाडीला खिंडार!

 

Mahavikas Aghadi faces hurdles in Buldhana : काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत

Buldhana विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलढाण्यात तर गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी सोडून महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश घेतले जात आहेत. आता काँग्रेस आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेसच्या बुलढाणा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रमिलाताई लक्ष्मण गवई आणि उ.बा.ठा. गटाचे मोताळा किसानसेना तालुकाप्रमुख सुधाकर सुरडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते विजयजी अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Buldhana Police : बेपत्ता मुलींचा शोध घेणार आहात की नाही?

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, भैय्या जयस्वाल आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी रुपेश गवई, प्रशिक मोरे, सलमान शहा, हसमुख पाटील, कुंदन झिने, निलेश जाधव, आदित्य मगरे, दीक्षांत नवघरे, आदेश राठोड, प्रवीण गायकवाड, योगेश जाधव, रोशन ठाकरे इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Prataprao Jadhav : कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही!

दिग्गज नेतेही शिवसेनेच्या वाटेवर?
काँग्रेसचे दिग्गज नेते देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, असे कळते. गेल्या काही दिवसांमध्ये माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासह काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे आणि नेते गणेश राजपूत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे अंभोरेंच्याच उपस्थितीत आता नवे पक्षप्रवेश झाले आहेत.