Dr. Mohan Bhagwat said we are witnesses to the work of Madhav Netralaya activists : माधव नेत्रालयाच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे आम्ही साक्षीदार
Nagpur : डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस, ते जन्मले तो दिवस रविवार.. गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती.. सर्व शुभ योग आज एकत्रितपणे जुळून आले. हे योग येण्यासाठी तपस्या करावी लागते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरात आज (३० मार्च) माधन नेत्रालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वामी गोविंद गीरी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माधव नेत्रालयाचे महासचिव डॉ. अविनाश चंद्र अग्नीहोत्री होते. यावेळी डॉ. भागवत म्हणाले, माधव नेत्रालयाच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे आम्ही साक्षीदार आहोत. तपस्येतून पुण्य येते, पुण्यातून फळ मिळते. ते फळ आपल्यासाठी न ठेवता त्याचा उपयोग लोककल्याणासाठी केला पाहिजे. त्यातून तपस्या पुढे सुरू राहते.
Narendra Modi : संघाची तपस्या लिहीत आहे विकसीत भारताचा नवा अध्याय !
संघाच्या स्वयंसेवकांची तपस्या अविरत सुरू आहे. यामागे जी प्रेरणा आहे, ती संघ विचारांची प्रेरणा आहे. संघ विचारांची प्रेरणा म्हणजे ती स्वार्थाची प्रेरणा नाही प्रतिक्रियेचेही प्रेरणा नाही. हतबलतेचीही नाही. तर शुद्ध सात्विक प्रेमाची ती प्रेरणा आहे. आपल्या समाजात दृष्टीहीन असू नयेत. ही समस्या राहीली तर हे शोभणार नाही. कारण हा समाज माझा आहे. त्यामुळे या समाजासाठी जे काही करू शकतो, ते तन मन धनाने करत राहीन, हा भाव स्वयंसेवकांमध्ये आहे. या प्रेरणेतून सर्व कार्यकर्ते कार्य करत आहेत, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
सन १९२६ मध्ये रामटेकच्या यात्रेत व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी जे काम केले, ते याच प्रेरणेतूनच केले. आज खूप क्षेत्रांमध्ये सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. दीड लाखाच्या वर कामे सुरू आहेत. ते याच प्रेरणेतून होत आहेत. हीच प्रेरणा स्वयंसेवकांनी स्वतःसाठी काहीच न करता समाजासाठी काम करणाचे बळ देते. त्यामुळे ते काम करतच राहतात. त्यामुळे अनुकुलता आली, बाधा दूर झाली. ध्येयाची दृष्टी कायम आहे. हे सेवेचे कार्य दयेच्या भावनेतून नाही, तर समाजाप्रती प्रेम आहे, म्हणून सुरू आहे. समाजात सर्वांनाच दृष्टी द्यायची असल्याचेही ते म्हणाले.
PM Narendra Modi : माधव नेत्रालय म्हणजे आध्यात्म, ज्ञान आणि गौरव गुरुतेचे अदभूत विद्यालय !
जिवनात जे काही मिळाले, त्या परिस्थितीता योग्य उपयोग करत आपले जिवन सार्थक, निरामय स्वस्थ करणे, यासाठी जी दृष्टी पाहिजे, त्याचे सारांश वर्णन म्हणजे साधना. एक तास शाखेत स्वतःचा विकास करायचा. त्यानंतर २३ तास त्याचा उपयोग समाजासाठी करायचा, हे संघाचे विचार आहेत. आणि हे काम असेच उत्तम चालत राहील. काम करणाऱ्यांचा भाव सेवेचाच राहणार आहे. त्याने समाज लाभान्वित होणार आहे. याच इच्छेतून स्वयंसेवक कार्य करत असल्याचे डॉ. मोहन भागवत यांनी नमूद केले.