व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Hakimi Multispeciality Hospital : चाळीस हजारांच्या देयकासाठी मृतदेह रोखला

Hakimi Multispeciality Hospital : चाळीस हजारांच्या देयकासाठी मृतदेह रोखला

 

Deadbody seized for payment of Rs. 40,000 : तब्बल सहा तास नातेवाइकांचा आक्रोश; थकबाकीच्या कारणावरून घडला प्रकार

Buldhana मलकापूर येथील हकिमी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका वृद्ध महिलेला मृत्यूनंतर तब्बल सहा तास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अवघ्या ४०,००० रुपयांच्या थकबाकीच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

कमलबाई यादव इंगळे (वय ६८, रा. शिराढोण, ता. मलकापूर) या महिलेचा ५ एप्रिल रोजी अपघातात डावा हात व पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्यांना हकिमी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ एप्रिल रोजी रात्री शस्त्रक्रिया झाली; मात्र ९ एप्रिल रोजी पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मृत्यूनंतर हॉस्पिटल प्रशासनाने ४० हजार रुपयांचे बिल थकले असल्याचे कारण देत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.

Malkapur Congress Meeting : ‘गद्दारांना बाजूला करा, नवख्या नेतृत्वाला संधी द्या!’

नातेवाइकांनी वारंवार विनंती करूनही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन ठोसर आणि माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांच्याशी संपर्क साधला. ठोसर व रावळ यांनी तत्काळ हॉस्पिटलला भेट देत तोडफोडीचा इशारा दिला, त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने नरम भूमिका घेत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

“महात्मा फुले आरोग्य योजनेच्या नावाखाली गरिबांची लूट सुरु आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असं मलकापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांनी म्हटलं आहे.

Buldhana District Collector : जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्ती टळली !

“रुग्ण Mahatma Phule Yojana अंतर्गत होता. कागदपत्रांची पूर्तता वेळेवर न झाल्याने परवानगी घेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. निधनानंतर औपचारिकता पूर्ण करून *एक रुपयाही न घेता सकाळी ९ वाजता मृतदेह सोपवण्यात आला,” असं हकिमी हॉस्पिटलचे संचालक डॉ. गौरव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!