Water crisis : तलावांच्या जिल्ह्यातील धरणं रिकामी!

Dams in Gondia district are empty : गोंदियात पाण्याचे संकट गहिरे; तलावही सुकले

Gondia ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचा संकट गंभीर रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प व तलाव कोरडे पडू लागले आहेत. परिणामी, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही गंभीर अडचणी निर्माण होणार आहेत.

फेब्रुवारी अखेरपर्यंत सिंचन प्रकल्पांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता. मात्र वाढत्या तापमानामुळे आणि पाण्याचा वापर वाढल्याने सध्या मोठ्या प्रकल्पांत केवळ ३५ टक्के तर ९ मध्यम प्रकल्पांत सरासरी ४४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी कमी असून लघुप्रकल्पांमध्ये देखील फक्त ४१ टक्के जलसाठा उरला आहे.

Action against defaulters : वणी पालिकेची ४ कोटी ३२ लाखांची वसुली!

बाघ-इटियाडोह प्रकल्पांतर्गत येणाऱ्या इटियाडोह, कालीसरार, पुजारीटोला, शिरपूर आदी महत्त्वाच्या धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. खालील आकडेवारीवरून येत्या काही आठवड्यांतच ही धरणं तळ गाठू शकतात, हे सिद्ध होते.

शिरपूर जलाशय – १८.७४%
कालीसरार धरण – ३८.१३%
इटियाडोह धरण – ३९.२१%

मध्यम प्रकल्पांमधून मुख्यतः पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र पाणीसाठा कमी झाल्यामुळे येत्या काही आठवड्यांत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ती सुरुवातही झाली आहे.

धरणांमधील पाणी शेतीसाठी वापरले जात असले, तरी परिस्थिती पाहता पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा तगवणे हे मोठं आव्हान ठरणार आहे. आगामी खरीप हंगामावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Ganesh Naik : शेतकऱ्याला मारहाण केली, चौकशी समिती नेमणार

तलावही कोरडे होतील?

जिल्हा परिषदेच्या १५०० हून अधिक जुने मामा तलाव, पाटबंधारे विभागाचे ३८ मामा तलाव, आणि २३ लघु प्रकल्प या सर्वांची स्थितीही फारशी वेगळी नाही. पाटबंधारे विभागाच्या तलावांमध्ये गेल्यावर्षी ६२.५८ टक्के जलसाठा होता, तर यंदा तो केवळ ३१.८३ टक्क्यांवर घसरला आहे.