व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amravati congress : काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांवर नाराजी, १४ नेत्यांचे पदासाठी अर्ज!

Amravati congress : काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांवर नाराजी, १४ नेत्यांचे पदासाठी अर्ज!

Discontent against the incumbent president in Amravati Congress; 14 leaders apply for the post : अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी चुरस; ‘सृजन अभियानाचा’ इफेक्ट

Amravati अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी यंदा मोठी चुरस निर्माण झाली असून तब्बल १४ इच्छुकांनी या पदासाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांच्याविरोधात नाराजीचा सूर स्पष्टपणे पुढे येत आहे.

काँग्रेसकडून सध्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येत असून देशभरात ‘सृजन संघटन अभियान’ राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी एआयसीसीचे निरीक्षक तथा हरियाणाचे आमदार आफताब अहमद आणि राज्य निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी चार दिवस अमरावतीत मुक्काम ठोकून बैठका घेतल्या.

Nari shakti vandan vidheyak : भाजपचा खटाटोप सत्ता टिकवण्यासाठी, काँग्रेसची टीका

या बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी शहर काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नियमानुसार, एखाद्या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुनर्नियुक्ती टाळली जाते. बबलू शेखावत यांची नियुक्ती २३ डिसेंबर २०२० रोजी झाली होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरू नये, अशी मागणी काही इच्छुकांनी केली आहे.

BJP, Vanchit Bahujan Aghadi : ‘आमच्यामुळेच उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी’, श्रेयवादाचे राजकारण सुसाट

दरम्यान, निरीक्षकांकडून विश्रामगृहात ‘वन-टू-वन’ तसेच सामूहिक संवादाद्वारे पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. ही सर्व मते बंद लिफाफ्यात अहवालाच्या स्वरूपात २३ किंवा २४ एप्रिल रोजी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर सुमारे २८ एप्रिलच्या सुमारास नव्या शहराध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!