व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण काँग्रेसकडून अदिती पोहरे यांचे ३ अर्ज, आज अर्जांची छाननी

काँग्रेसकडून अदिती पोहरे यांचे ३ अर्ज, आज अर्जांची छाननी

अमरावती शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी २० उमेदवारांचे २९ अर्ज दाखल

Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी (६ ऑक्टोबर) २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या ३१ झाली आहे. दरम्यान, आज दोन व्यक्तींनी सहा नामनिर्देशनपत्रे उचलली.

भाजपकडून संगीता शिंदे-बोंडे, भोयर चंद्रशेखर

भाजपकडून संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे यांनी भाजपसह दोन अपक्ष अर्ज दाखल केले. तसेच भोयर चंद्रशेखर ऊर्फ शेखर मनोहरराव यांनी भाजपसह अपक्ष अर्ज दाखल केला.

शिवसेनेकडून उपेंद्र पाटील

उपेंद्र बाबाराव पाटील यांनी शिवसेनेसह अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचीही उमेदवारी दाखल झाली आहे.

पाणी कपात करायचीच होती तर ३८ हजार कोटींचा ‘उपसा’ कशाला?

काँग्रेसकडून अदिती पोहरे

अदिती ऋषिकेश पोहरे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाकडून प्रीती रेवणे

प्रीती हर्षल रेवणे यांनी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षासह अपक्ष अर्ज दाखल केला.

बळीराजा पार्टीकडून प्रा. अनिल काळे

प्रा. अनिल मधुकरराव काळे यांनी बळीराजा पार्टीकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले.

अन्य उमेदवार

शेवटच्या दिवशी सुमित सुरेशराव पवार, विनोद प्रल्हाद कडू, दिलीप भीमराव कडू, सजील खान खलील खान, श्रीकृष्ण सूर्यभान पहुरकर, प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे, नितीन सुभाषराव आगे, गजानन रामचंद्र उल्हे, मिलिंद तुकाराम ब्राह्मणे, किरण अर्जुन चौधरी, हेमलता दिलीपसिंग मुनोत, किरण अर्जुन पवार, राजेशकुमार शालिग्राम कड आणि रामदास संपतराव कटक यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

मागण्या मान्य केल्या, त्रुटी दूर केल्या, विद्यार्थी समाधानी आहेत, मग तुम्ही आंदोलनाचे स्टंट का करताय?

निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांच्या कार्यालयातील सभाकक्ष क्रमांक २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे ही छाननी करण्यात येणार आहे.

उमेदवारी मागे घेण्याची सूचना उमेदवाराला किंवा त्याने लेखी प्राधिकार दिलेल्या प्रस्तावकाला अथवा निवडणूक प्रतिनिधीला शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे देता येणार आहे.

error: Content is protected !!