व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण मागण्या मान्य केल्या, त्रुटी दूर केल्या, विद्यार्थी समाधानी आहेत, मग तुम्ही आंदोलनाचे...

मागण्या मान्य केल्या, त्रुटी दूर केल्या, विद्यार्थी समाधानी आहेत, मग तुम्ही आंदोलनाचे स्टंट का करताय?

एमपीएससीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवाराना रोखठोक सवाल

Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व रास्त मागण्या सरकारने पूर्णपणे मान्य केल्या आहेत. ज्या काही तांत्रिक त्रुटी होत्या, त्याही दूर केल्या जात असून विद्यार्थी या निर्णयाने समाधानी आहेत. असे असतानाही केवळ स्वतःचा राजकीय अजेंडा रेटण्यासाठी आमदार रोहित पवार आंदोलनाचे स्टंट करत आहेत, असा थेट टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

एमपीएससी अध्यक्षांच्या हकालपट्टीच्या मागणीवर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना सरकार परस्पर किंवा मनमानी पद्धतीने हटवू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करावी लागते, ही घटनात्मक तरतूद विरोधकांनाही ठाऊक आहे. ज्या अध्यक्षांच्या कार्यकाळात कोणताही पेपर फुटलेला नाही, त्यांना कसलीही चौकशी न करता केवळ दबावापोटी पदावरून हटवणे कितपत योग्य आहे, याचे उत्तर खुद्द रोहित पवार यांनीच द्यावे, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेष म्हणजे, पेपरफुटीच्या वादावरून जी परीक्षा रद्द करण्यात आली, त्यावेळी भीमनवार हे अध्यक्षच नव्हते असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला.

गडचिरोलीत वासेकरांच्या बैठकींनी राजकीय चर्चेला उधाण

मात्र कुणाच्याही मनात संशय राहू नये यासाठी सरकारने अत्यंत पारदर्शक पाऊल उचलल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, आम्ही या संदर्भात राज्यपालांना रीतसर पत्र दिले आहे. सध्याच्या आणि यापूर्वीच्या अध्यक्षांच्या कार्यकाळात पार पडलेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी लावली आहे. या चौकशी अहवालात जर काही गंभीर बाबी समोर आल्या, तर कारवाई करण्यास सरकार मागे-पुढे पाहणार नाही. गरज पडल्यास राष्ट्रपतींकडे अध्यक्षांना हटवण्याची शिफारस करण्याचीही आमची तयारी आहे. परंतु कोणतीही चौकशी न करता थेट कारवाई करणे कायद्याला धरून नाही.

निवडणूक कार्यालयावर इंडिया आघाडीची धडक; बॅरिकेड्स तोडणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

काही दिवसांपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पेपरफुटी आणि इतर मागण्यांसाठी मोठे आंदोलन छेडले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या आणि परीक्षेच्या पद्धतीत आवश्यक सुधारणांचे आदेश दिले होते. सरकारच्या या आश्वासनांनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतु, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले असतानाही आमदार रोहित पवार यांनी याच विषयावर पुण्यात पुन्हा आंदोलन सुरू केल्याने, ते विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निव्वळ राजकारण करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

error: Content is protected !!