ashok-kharat-nashik-crime-sit-video-evidence-farmhouse : फार्महाऊसवरील आक्षेपार्ह व्हिडिओ एसआयटीच्या हाती
Nashik : पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ऑफिसबॉयच्या साक्षीनंतर आता त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या स्वयंपाकीनेही पुढे येत खरातच्या कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश केला असून या प्रकरणातील तपास अधिक तीव्र झाला आहे.
तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, फार्महाऊसमधील सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथक अर्थात एसआयटी च्या हाती लागले आहे. या व्हिडिओंमध्ये अशोक खरात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळे त्याच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांना अधिक बळ मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका चार्टर्ड अकाउंटंटने या स्वयंपाक्याच्या माध्यमातून फार्महाऊसवरील हालचालींवर लक्ष ठेवले होते आणि त्यातूनच हे पुरावे समोर आले.
Ritesh Deshmukh : “शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान सहन करणार नाही”
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रकरणात सातत्याने नवे पुरावे समोर येत असल्याने एसआयटी कडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यास पुढील गुन्ह्यांमध्ये ताबा घेण्याची तयारीही पोलिसांनी सुरू ठेवली आहे.
तपासादरम्यान अशोक खरात सहकार्य करत नसल्याची माहितीही समोर येत आहे. सुरुवातीला चौकशीदरम्यान प्रश्नांना टाळाटाळ करणारा खरात आता ‘काही आठवत नाही’ असा दावा करत असल्याचे समजते. यापूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; वॉशिंग्टनमध्ये डिनरदरम्यान गोळीबार
या प्रकरणात समोर येत असलेल्या नव्या पुराव्यांमुळे आणि साक्षींमुळे तपास अधिक व्यापक होत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








