व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu Kadu : सत्तेत राहून आंदोलनाची वेळ आणू नका, बच्चू कडूंचा अतुल...

Bacchu Kadu : सत्तेत राहून आंदोलनाची वेळ आणू नका, बच्चू कडूंचा अतुल सावेंना इशारा

Bacchu Kadu warns Minister Sane regarding issues concerning Ashram schools and persons with disabilities : आश्रमशाळा आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर आश्वासनांची पूर्तता न झाल्यास हक्कभंग आणणार

Amravati आश्रमशाळा आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर महिनाभरापूर्वी दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याने शिवसेना नेते बच्चू कडू यांनी सामाजिक न्यायमंत्री अतुल सावे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सत्तेत सहभागी असताना आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आश्रमशाळांच्या परिस्थितीबाबत आपण विधिमंडळात स्वतः चर्चा केली होती. त्यावेळी मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला एक महिना उलटूनही प्रश्न मार्गी लागले नसल्याचा आरोप कडू यांनी केला.

दिव्यांगांचे मानधन, वसतिगृह आणि शाळांशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली. ‘‘अजित पवार उपमुख्यमंत्री असताना पाच तारखेपर्यंत मानधन न झाल्यास वित्त सचिवांचे मानधन थांबविण्याची भाषा करीत होते. आता ते गेले आणि शब्दही गेला. आम्हाला शब्द देणारा मंत्री शोधण्याची वेळ आली आहे,’’ अशी टीका कडू यांनी केली.

Devendra Fadnavis : गडकरींनंतर मुख्यमंत्र्यांचेही जलपर्णीमुक्त अंबाझरीत नौकायान

संघटना कुटुंबापुरती मर्यादित नसते

कोणतीही संघटना एका व्यक्तीच्या कुटुंबापुरती मर्यादित नसते. तिच्यासाठी अनेकांनी त्याग केलेला असतो, हे उद्धव ठाकरे यांनी समजून घ्यावे, असे कडू म्हणाले. शिवसेना प्रहारमध्ये विलीन करण्याची वेळ येणार नाही. शिवसेना आणि शिवसेनेतील वाघ कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निकाल आमच्याच बाजूने लागेल

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला. निकाल वेगळा लागला तरी शिंदे सक्षम असून केवळ नाव आणि चिन्हावर राजकारण अवलंबून नसते, असे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar, Parth Pawar : सिल्व्हर ओकवर पार्थ-शरद पवारांमध्ये ३ तास ‘गुफ्तगू’; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण

अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज

राज्यात वारंवार घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवरही कडू यांनी चिंता व्यक्त केली. अशा घटना रोखण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज असून, गुन्हे घडल्यानंतर तातडीने कारवाई आणि शिक्षा होण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!