व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ravikant Tupkar : आमदारांचे वेतन-भत्ते रोखा अन् शेतकऱ्यांना मदत करा

Ravikant Tupkar : आमदारांचे वेतन-भत्ते रोखा अन् शेतकऱ्यांना मदत करा

Ravikant tupkar protest for farmers demand : तुपकरांचे अर्धनग्न आंदोलन, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Amravati शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अन्यथा लोकप्रतिनिधींचे वेतन-भत्ते तसेच विविध प्रकल्पांवरील खर्च थांबवावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न ठिय्या आंदोलन केले.

गेल्या तीन महिन्यांपासून अमरावतीसह राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी तुपकर यांनी केली.

तसेच कोणतीही तांत्रिक कारणे पुढे न करता सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Akola Municipal Corporation : पाईपलाईन फुटली, रस्ता खचला; मनपाचा कारभार रामभरोसे!

आंदोलनकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहतूक एका बाजूने वळविण्यात आली. आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांतही पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा तुपकर यांनी केला. राज्यकर्त्यांनी मंत्रालयातील थंडगार खोल्यांमध्ये बसून धोरणे आखण्याऐवजी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका जाहीर करावी, असे ते म्हणाले.

“शेतकरी जगला तरच राज्य आणि देशाचे भविष्य सुरक्षित राहील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे,” असेही तुपकर यांनी सांगितले.

हे आंदोलन लवकरच राज्यभर तीव्र करण्यात येणार असून, त्यासाठी संघटनेची राज्यभर भ्रमंती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात पंजाबमधील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर राज्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Amruta Fadnavis : गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला हरकत काय? राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद

दिल्लीतील जंतर-मंतरवर अलीकडे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत तुपकर यांनी तरुण पिढीच्या वाढत्या सहभागाकडे लक्ष वेधले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेतही तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून, भविष्यात संघटना कोणती भूमिका घेईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असा इशाराही त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.

या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरके, विदर्भ प्रमुख किरण ठाकरे, विदर्भ संपर्कप्रमुख अमित अढाऊ, युवा अध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!